शिवसेनेच्या 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी दुपारी भेट घेतल्याची मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीत हे 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. या बारा खासदारांनी काही वेळापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली होती. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत, खासदारांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. त्यांना मदतीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहे.
( हेही वाचा: “शरद पवारांनी शिवसेना फोडली, जे घडलं ते पवारांनी घडवून आणलं”- रामदास कदम )
शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदारांची नावे
- श्रीकांत शिंदे – कल्याण
- राहुल शेवाळे- दक्षिण मध्य मुंबई
- हेमंत पाटील- हिंगोली
- प्रतापराव जाधव- बुलडाणा
- कृपाल तुमाणे- रामटेक
- भावना गवळी- यवतमाळ- वाशिम
- श्रीरंग बारणे- मावळ
- संजय मंडलिक- कोल्हापूर
- धैर्यशील माने- हातकणंगले
- सदाशिव लोखंडे- शिर्डी
- हेमंत गोडसे- नाशिक
- राजेंद्र गावित- पालघर