बारामतीत विविध पक्षांतील 12 खासदार हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. खासदारांचा हा दौरा वैयक्तिक स्वरुपाचा असल्याचे सांगितले जात आहे. पण, या दौ-यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
विकासकामांचा आढावा
या दौ-यात एकूण 19 लोकांचा समावेश आहे. यात 12 खासदारांसह काही उद्योगपतींचाही सहभाग आहे. या दौ-याचे प्रयोजनच बारामतीतील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी असल्याचे सांगितले जात होते. बारामतीत आल्यानंतर या खासदारांनी विकासकामांचा आढावा घेतला. विमानतळावरुन बाहेर पडल्यानंतर फेरेरो या आंतरराष्ट्रीय चाॅकलेट कंपनीला भेट दिली. नंतर बारामतीतील महिलांनी बांधलेल्या टेक्सटाइल पार्कला भेट दिली आणि तिथल्या महिलांशी संवादही साधला.
( हेही वाचा मुंबईकरांनो आता प्रवास होणार सुसाट, पाडव्याला मेट्रोचा शुभारंभ! )
यांची उपस्थिती
बारामतीतील संकुल विद्या प्रतिष्ठानलाही या 12 खासदारांकडून भेट देण्यात आली. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार हे यावेळी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community