‘राष्ट्रवादीचे 12 नेते फुटले आहेत,मुहूर्त ठरायचा बाकी आहे’, शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

132

शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटातून शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असतानाच आता शिंदे गटातील आमदाराने मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील 12 नेते शिंदे गटात लवकरच सहभागी होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात हे 12 नेते कोण, याची चर्चा सुरू झाली आहे.

ठरलेलं आहे, फक्त थोडं थांबा…

70 आमदार शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीशी मजबूतपणे उभे आहेत. सर्व आमदार आपल्या मतदारसंघात योग्य पद्धतीने काम करत असून त्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नेते फुटलेले आहेत. फक्त त्यांचा मुहूर्त ठरत आहे. सोलापुरातील राष्ट्रवादीचा मोठा नेता दणका देणार असल्याचे ठरले आहे. त्यासाठी थोडा वेळ थांबा, असा खळबळजनक दावा आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

(हेही वाचाः कोरोनाचा शाळांनाही बसला फटका, 20 हजारांहून अधिक शाळांना लागले कुलूप)

राष्ट्रवादीने फेटाळला दावा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीसारखी कोणतीही परिस्थिती नाही. त्यामुळे आमच्या पक्षाबाबत या सगळ्या अफवा पसरवण्यात येत आहेत. पण आम्ही सगळे एक आहोत आणि एकदिलाने काम करत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शहाजीबापूंच्या विधानावरुन दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.