धाराशिवच्या कळंब नगर परिषदेतील १७ पैकी १२ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

105

धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष आणि सभापतींचा समावेश आहे. यामुळे कळंब तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून, ठाकरे गटातील तीन नगरसेवकांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केल्याने कळंब नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

( हेही वाचा : धीरेंद्र शास्त्रींच्या अडचणी वाढल्या! वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल)

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचे काम सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक शिवसेनेत सामील होण्यासाठी येत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नगरसेवक शिवसेनेत आले असून, ठाकरे गटाचे ३ नगरसेवक कालच शिवसेनेत दाखल झालेत. त्यामुळे १७ पैकी १५ नगरसेवक आपल्याकडे आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडे आता काय उरलंय? जे होते ते झेंडेही आता इकडे आले आहेत.

कळंब तालुक्यातील या नगरसेवकांनी माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्थानिक पातळीवरील विकासकामे करण्यासाठी पालकमंत्री सक्षम आहेत, तरीही यापुढे प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी अधिक निधी दिला जाईल असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यांनी केला प्रवेश

माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, माजी नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, माजी नगराध्यक्ष आशा भवर, माजी उपनगराध्यक्ष सुभाष पवार, माजी उपनगराध्यक्ष इंदुमती हौसलमल, माजी उपनगराध्यक्ष साधना बागरेचा, माजी उपनगराध्यक्ष गीता पुरी, माजी उपनगराध्यक्ष सफुरा शकील काझी, माजी गटनेता लक्ष्मण कापसे, माजी नगरसेवक मुख्तार बागवान, माजी नगरसेवक निलेश होनराव यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.