राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे सरकारमध्ये विलगीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी ४ महिने संप केला होता. तरीही त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही, मात्र त्या दरम्यान १२० हुन अधिक राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. या विषयाची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा आठवण करून दिली. १२० एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी ‘याला मी स्वतःच जबाबदार आहे’, अशी कबुली देतील का, असे आव्हान दिले.
एसटी संपावर तात्काळ निर्णय का घेतला नाही?
शिवसंपर्क अभियान अंतर्गत शिवसेनेची मुंबईत मोठी सभा झाली. त्या सभेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची चिरफाड केली. त्यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, मागील तीन महिन्यांपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांना वेतन देण्यात आले नाही. याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील का? १२०हुन अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, त्यालाही मुख्यमंत्री जबाबदार होते, ४ महिने संप सुरु होता, त्यावर वेळीच निर्णय का घेतला नाही, यामागील कारणे मुख्यमंत्री सांगतील का, असेही केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community