महाराष्ट्रातील भाजपचे १२५ कार्यकर्ते उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी जाणार!

महाराष्ट्र आणि मुंबईतील भाजपचे उत्तर भारतीय कार्यकर्ते हे उत्तर भारतीय मोर्चामध्ये कार्यरत आहेत. त्यातील १२५ कार्यकर्ते हे उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी सहाय्यक म्हणून जाणार आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हे कार्यकर्ते तेथील विविध जिल्ह्यात भाजपच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार प्रसार करणार आहेत. कारण मुंबई आणि महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांची उत्तर प्रदेशात घरे आहेत, नातेवाईक आहेत. त्यांच्याशी त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे हे कार्यकर्ते उत्तर प्रदेशात जाऊन प्रचार प्रसार करणार आहेत, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र भाजपचा उत्तर भारताशी कनेक्ट

गेल्या ७ वर्षांत नरेंद्र मोदी आणि ५ वर्षांत योगीजींच्या मार्गदर्शनात भाजपने उत्तर प्रदेशात मोठे कार्य केले आहे. तेथील भाजप पक्ष मजबूत आहे. त्या जोरावर ते निवडणूक जिंकणारच आहेत. मात्र तरीही मुंबई आणि महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे उत्तर प्रदेशात नातेवाईक आहेत. त्यांच्याशी त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे ते त्याठिकाणी जाऊन भाजपाला प्रचार कार्यालयात मदत करणार आहेत, असे फडणवीस म्हणाले. यासाठी भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या १२५ कार्यकर्त्यांची फळी उत्तर भारतात जाणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here