वंदना बर्वे
तब्बल १७७ देशांमध्ये योग दिवस साजरा करण्यात आला असून पंतप्रधान मोदी यांनी यूएनमध्ये योगासने करून योग दिवस साजरा केला. यामुळे देशातच नव्हे तर विदेशात देखील भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. आता संपूर्ण जगापर्यंत पोहोचण्यासाठी, संपूर्ण जगाला आपले बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग. जगामध्ये भारताची ओळख निर्माण करण्याचा मार्ग योगासने झाला असता असे मला वाटते, असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले.
२०१४मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सुमारे ७ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या विरोधाला न जुमानता भारताच्या योग डिप्लोमेसीला यूएनमध्ये मान्यता देण्यात आली.
२७ सप्टेंबर २०१४ रोजी पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघात प्रथमच दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, मोदींच्या या भाषणातून हे स्पष्ट झाले होते की, भारत आता खुलेआम योगाचा वापर डिप्लोमेसी म्हणून करत आहे.
११ डिसेंबर २०१४ रोजी, संयुक्त राष्ट्रातील भारतीय राजदूत अशोक मुखर्जी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडला. यानंतर पाकिस्तानने भारताच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला नाही. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा ठराव पास व्हावा असे पाकिस्तानला वाटत नव्हते. या प्रस्तावाला आधीच संयुक्त राष्ट्रांच्या १७७ देशांचा पाठिंबा होता.
पाकिस्तानची इच्छा नसतानाही मुस्लिम देशांची संघटना असलेल्या OICच्या ५६ पैकी ४८ देशांनी भारताला पाठिंबा दिला. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रस्तावावर चीननेही पाकिस्तानऐवजी भारताला पाठिंबा दिला.
अशा प्रकारे मतदानाशिवाय भारताचा हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात एकमताने मंजूर करण्यात आला. तेव्हा भारताने योग डिप्लोमेसीच्या माध्यमातून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पटलावर एकाकी पाडले होते.
त्याच वेळी, २०१८मध्ये भारत आणि चीनच्या लष्करामध्ये डोकलाम वाद झाला होता. असे असूनही, एक वर्षानंतर, २१ जून २०१९ रोजी, भारत आणि चीनच्या सैनिकांनी गुवाहाटीमध्ये एकत्र आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. त्यानंतर योग डिप्लोमसीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या लष्करांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community