भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ‘ब्रिक्स’च्या बैठकीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अफगाणिस्तानचा विषय चर्चेला आणत अफगाणिस्तानने त्यांच्या शेजारील राष्ट्रासाठी धोका बनेल असे काहीही करू नये, त्या देशांमध्ये दहशतवाद आणि ड्रग्स तस्करीसारखा धोका निर्माण करू नये, अशा शब्दांत ठणकावले आहे. १३व्या ब्रिक्स शिखर संमेलनात ते बोलत होते.
रशियाच्या भूमिकेमुळे चीन-पाकला चपराक!
अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी त्यांचे सैन्य माघारी घेतल्यावर अफगाणिस्तान संकटात सापडला आहे. त्याचा जगावर आणि प्रदेशाच्या सुरक्षिततेवर काय परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘ब्रिक्स’मधील सर्व याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले. पुतीन यांची ही टिप्पणी सद्यस्थितीत महत्वाची मानली जात आहे, कारण अफगाणिस्तानात सत्तानंतर झाल्यावर रशियाने त्याचे अप्रत्यक्षपणे होते, तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होते. चीनची भूमिकाही तालिबानच्याच बाजूने असल्याचे सकृत दर्शनी दिसते. पाकिस्तान तर उघडपणे तालिबानचे समर्थन करत आहे. अशा परिस्थितीत पुतीन यांच्या या कठोर टिप्पणीचे मोठे परिणाम होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १३व्या ब्रिक्स शिखर समेलनाचे अध्यक्ष होते. त्यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, नुकतेच पहिले “ब्रिक्स डिजिटल आरोग्य संमेलन” आयोजित करण्यात आले होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने ही एक अभिनव सुरुवात आहे. नोव्हेंबर महिन्यात आमचे जलसंपदा मंत्री ब्रिक्स फॉर्म्याटमध्ये पहिल्यांदाच भेटतील.
Join Our WhatsApp Community