चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून चिंचवड दळवीनगर येथून एसएसटी पथकाला एका वाहनातून सुमारे 14 लाख रुपयांपेक्षा अधिकची रोकड शुक्रवार, २४ फेब्रुवारी, दुपारी आढळून आली आहे. पुढील तपासासाठी ही संशयित रक्कम आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक सुरु आहे. शुक्रवारी निवडणुकीचा प्रचार बंद करण्यात आला असून 28 उमेदवार रिंगणात आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने विविध अॅक्टीव्ह केली आहेत. पोटनिवडणुकीत पैशांचे वाटप होऊ नये, यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघातील विविध भागात “स्टॅटिक सर्व्हिलन्स” पथकांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी दळवीनगर येथे पैसे मिळाले असून पुढील तपासासाठी सदर संशयित रक्कम आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community