अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (ACK) च्या 306 कंपन्यांच्या अहवालानुसार, मेक्सिको, अमेरिका आणि युरोपला मागे टाकून भारत (India) आता गुंतवणूकदारांची सर्वोच्च पसंती बनत आहे. गेल्या वर्षी भारत गुंतवणुकीसाठी पाचव्या क्रमांकावर होता, तर या वर्षी तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील ५० कंपन्यांनी चीनमधून गाशा गुंडाळला आहे, त्यातील १५ कंपन्या भारतात येणार आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.
(हेही वाचा Toll: वरळी सी लिंक आणि समृद्धी महामार्गाच्या टोलमध्ये घोळ! राज्य सरकारची मोठी कारवाई)
भारत (India) सध्या दक्षिण पूर्व आशियामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. इंडोनेशिया, सिंगापूर आणि मलेशिया अजूनही गुंतवणूकदारांची पसंती आहेत. चीन गुंतवणूकदारांमध्ये प्राधान्य गमावत आहे. चीनमध्ये अमेरिकेची १२ लाख कोटी रुपयांची होती, आता त्यातील मोठा भाग भारताकडे (India) येणार आहे. विशेषतः व्यवस्थापन विषयावरही भारत अग्रेसर बनत आहे. गेल्या वर्षी, 40 टक्के अमेरिकन कंपन्या ज्या पूर्वी चीनमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत होत्या, आता भारतात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. विशेषतः व्यवस्थापन सल्लागार क्षेत्रातील, 54 टक्के कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणुकीची भारताकडे दिशा बदलली आहे.
चीनची धोरणे कंपन्यांना नावडती
कोरोनानंतर चीनमधील गुंतवणुकीच्या वातावरणात अनेक मोठे बदल झाले आहेत, जे परदेशी कंपन्यांना आवडत नाहीत. शी जिनपिंग यांच्या सरकारने बेरोजगारी आणि वृद्ध लोकसंख्येसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक बदल केले आहेत, परंतु या बदलांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
Join Our WhatsApp Community