नगरसेवक ते राष्ट्रपती, असा आहे द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास!

189
भारताच्या राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात मुर्मू यांचा जन्म झाला. मुर्मू यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर पुढे भुवनेश्वरमधील रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कला शाखेतून पदवी घेतल्यावर त्यांनी शिक्षकाच्या नोकरीपासून करिअरला सुरुवात केली, त्यांनी काही वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले. २० जून १९५८ रोजी जन्मलेल्या मुर्मू यांनी १९९७ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९७ मध्ये पहिल्यांदा ‘त्या’ नगरसेविका बनल्या.

२०१५ मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणून निवड

ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या दोनदा भाजपच्या आमदार झाल्या. त्यानंतर २००० ते २००४ दरम्यान सरकारमध्ये मंत्रीही झाल्या. त्यांची वाणिज्य आणि वाहतूक मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर त्या ओडिशाच्या मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री बनल्या. पुढे त्यांनी विभानसभा निवडणुकीत पाऊल ठेवले. त्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने त्यांना २०१५ मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणून निवडले. मागील वर्षी २०२१ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला.

पती आणि मुलाचे निधन

भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या राष्ट्रपती मुर्मू यांनी २००९ ते २०१५ या अवघ्या सहा वर्षात पती, दोन मुले, आई आणि भाऊ असे जवळचे गमावले. मुर्मू यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी तीन मुले होती. २००९ मध्ये मुर्मू यांच्या एका मुलाचे निधन झाले. त्यानंतर तीन वर्षांनी २०१२ मध्ये दुसऱ्या मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्याआधी त्यांचे पती श्याम चरण यांचेही कार्डियक अरेस्टने निधन झाले. सध्या त्यांची मुलगी इतिश्री ओडिशातील एका बँकेत काम करते.

देशाच्या १५व्या राष्ट्रपती बनल्या

भारतात १५व्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली असून द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५व्या राष्ट्रपती बनल्या आहेत. मुर्मू यांना बीजू जनता दल, युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी, बहुजन समाज पार्टी (बीएसपी), एआयएडीएमके, तेलुगू देशम पार्टी (टीडीपी), जनता दल, शिरोमणि अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा अशा पक्षांचे समर्थन मिळाले. मुर्मू भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.