Maharashtra Assembly Election मध्ये सर्व पक्षातील १७ दिग्गजांचा झाला पराभव

117

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात (Maharashtra Assembly Election)  महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. या निवडणुकीत अनेक मोठ्या आणि दिग्गज चेहऱ्यांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यापासून ते मंत्री राहिलेल्या नेत्यांचाही समावेश आहे. (Maharashtra Assembly Election)

१. बाळासाहेब थोरात 

या निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पराभव पत्करावा लागला. संगमनेरमध्ये शिवसेनेचे अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केला. १०,५०० हून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला.

२. नवाब मलिक 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते नवाब मलिक यांचा शिवाजी मानखुर्द जागेवर पराभव झाला आहे. अबू आझमी यांनी त्यांचा पराभव केला. ते 30 हजारहून अधिक मतांनी पराभूत झाले आहेत.

३. पृथ्वीराज चव्हाण 

या यादीत माजी मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव आहे. कराड दक्षिणमधून त्यांचा पराभव झाला. भाजपचे अतुलबाबा भोसले यांनी त्यांचा पराभव केला.

४. संजय काका पाटील 

तासगाव कवठेमहंकाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रोहीत पाटील यांनी पराभव केला. त्यांचा 15 हजारहून अधिक मतांनी पराभव झाला.

(हेही वाचा Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय असेल ? वाचा सविस्तर… )

५. इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगरमधील औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपा नेते अतुल सावे यांनी एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा पराभव केला. जलील यांचा जळवपास 2 हजार मतांनी पराभव झाला.

६. हर्षवर्धन पाटील 

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली. या लढतीत राष्ट्रवादी (अजित पवार)चे दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला आहे. त्यांनी माजी मंत्री, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. 19 हजार 410 पाटील यांचा पराभव झाला.

७. राजेश टोपे 

घनसावंगीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण यांनी राष्ट्रवादा काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री राजेश टोपे याांचा पराभव केला.

८. बाळासाहेब पाटील 

कराड उत्तरमध्ये भाजपाचे मनोज घोरपडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील यांचा पराभव  केला आहे. पाटील यांचा 43691 मतांनी पराभव झाला.

९. माणिकराव ठाकरे 

दिग्रसमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड यांनी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला आहे. ठाकरे यांचा 28775 मतांनी पराभव झाला आहे.

१०. राम शिंदे 

कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी भाजपा नेते राम शिंदे यांचा पराभव केला. शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव झाला.

११. भावना गवळी 

रिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनके यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांचा पराभव केला. त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. या निवडणुकीत गवळी यांचा 16116 मतांनी पराभव झाला आहे.

१२. यशोमती ठाकूर 

तिवसा येथे भाजपाचे राजेश वानखेडे यांनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा पराभव केला. ठाकरू 7617 मतांनी पराभूत झाल्या.

१३. के सी पाडवी 

अक्कल  कुवा येथे शिवसेना शिंदे गटाचे अमश्या पाडवी यांनी काँग्रेसचे के सी पाडवी यांचा पराभव केला. पाडवी 2904 मतांनी पराभूत झाले.

१४. राजन विचारे 

ठाण्यात भाजपाचे संजय केळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव केला. विचारे 58253 मतांनी पराभव  केला.

१५. सदा सरवणकर 

माहिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी पराभव केला. सदा सरवणकर यांचा 1316 मतांनी पराभव  झााला.

१६. समरजितसिंह घाटगे

कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समरजीत  सिंह घाटगे यांचा पराभव केला आहे. घाटगे यांचा 11581 मतांनी पराभव  झाला.

१७. बच्चू कडू 

अचलपूरमध्ये भाजपचे प्रवीण तायडे यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चूकडू यांचा पराभव केला आहे. कडू 12131 मतांनी पराभूत झाले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.