पहिल्यांदाच १२ महिन्यांत होणार १८ IAS अधिकारी निवृत्त!

165

२०२२ या वर्षात राज्यातील १८ आयएएस अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत. बारा महिन्यांत अठरा अधिकारी निवृत्त होण्याची ही पहिली वेळ आहे. याआधी जॉनी जोसेफ मुख्य सचिव असतानाच्या काळात दहा अधिकारी एका वर्षात सेवानिवृत्त झाले होते. सध्या महाराष्ट्रासाठी ४३८ आयएएस अधिकाऱ्यांच्या जागा मंजूर आहेत. जानेवारी २०२९च्या यादीनुसार ३४० आयएएस अधिकारी महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी १८ अधिकारी या वर्षात सेवानिवृत्त होतील, तर २०२१ मध्ये सीताराम कुंटे, प्रवीण परदेशी, शामलाल गोयल यासारखे काही अधिकारी निवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्रात ७० ते ८० जागा रिक्त होणार

वरील अधिकारी निवृत्त झाल्याने मंजूर जागा आणि कार्यरत अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रात ७० ते ८० जागा रिक्त होणार आहेत. त्यामध्ये ५ टक्के अधिकारी प्रशिक्षणासाठी जाणारे असतात. त्यामुळे काही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार दिला जातो. महाराष्ट्रात या जागा पूर्णपणे भरल्या जाव्यात यासाठी राज्य सरकारनेही प्रयत्न करण्याची गरज आहे.

(हेही वाचा –सर्वच औषध पुरवठादारांनी हाफकिनला काळ्या यादीत टाकले, वाचा काय आहे कारण)

सुरेश काकाणी ३० एप्रिल रोजी होणार सेवानिवृत्त 

असे सांगितले जात आहे की, नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त संजय देवरे ३१ जानेवारी रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत, तर फेब्रुवारी महिन्याच्या २८ तारखेला तीन अधिकाऱ्यांची कामाची शेवटची तारीख असणार आहे. प्रभारी मुख्य सचिव देवाशिष चक्रबोर्ती, शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आवासाहेब जराड यांचा त्यात समावेश आहे. मात्र जराड यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष केलेले असल्याने पुढील आदेशापर्यंत ते त्या पदावर कायम राहतील. यासह दिल्लीमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेले केमिकल आणि पेट्रोकेमिकल ८ विभागाचे अतिरिक्त सचिव समीर विश्वास हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यासोबतच ओबीसी आणि बहुजन मंडळाचे संचालक दिलीप हळदे आणि डेरी फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्यामसुंदर पाटील हेही सेवानिवृत्त होतील, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आणि मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हे दोघेही ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत होणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.