अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जयशंकर यांनी वॉशिंग्टन (Washington) येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, अमेरिकेत (America) बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या वापसीसाठी आम्ही तयार आहोत. परराष्ट्र मंत्र्यांनी या मुद्द्यावर भारताची भूमिका स्थिर आणि तत्त्वनिष्ठ असल्याचे वर्णन केले. जयशंकर (S. Jaishankar) यांनी याबाबत अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली आहे. जयशंकर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक पत्रही ट्रम्प यांना सुपूर्द केले.
2023 मध्ये 3,86,000 लोकांना H-1B व्हिसा मंजूर
अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे 18 हजार भारतीय त्यांच्या देशात परतणार आहेत. अमेरिकन वेबसाइट ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, त्यांच्याकडे अमेरिकन नागरिकत्व नाही आणि तिथले नागरिकत्व मिळवण्यासाठी योग्य कागदपत्रेही त्यांच्याकडे नाहीत. अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांशी व्यवहार करणाऱ्या सरकारी संस्थेने (ICE) गेल्या महिन्यात बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या सुमारे 15 लाख लोकांची यादी तयार केली होती. या यादीत 18 हजार भारतीयांचा समावेश आहे. यूएस सरकारच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये 3,86,000 लोकांना H-1B व्हिसा मंजूर करण्यात आला, त्यापैकी सुमारे तीन चतुर्थांश भारतीय नागरिक आहेत. (S. Jaishankar)
वाणिज्य दूतावासावर झालेला हल्ला ही अतिशय गंभीर बाब
जयशंकर (S. Jaishankar) म्हणाले की त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्ज यांच्याशी बांगलादेशच्या मुद्द्यावर थोडक्यात चर्चा केली आहे. पत्रकारांनी जयशंकर यांना बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीशी संबंधित चर्चेबाबत विचारले होते. परराष्ट्रमंत्र्यांना भारतीय वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यांबाबतही विचारण्यात आले. जयशंकर म्हणाले की, या विषयावर चर्चा झालेली नाही. हे मुद्दे मी यावेळी मांडले नाहीत. पण सॅन फ्रान्सिस्कोमधील आमच्या वाणिज्य दूतावासावर झालेला हल्ला ही अतिशय गंभीर बाब आहे, असे मी म्हणायला हवे. आम्ही या प्रकरणात उत्तरदायित्वाची अपेक्षा करतो आणि जबाबदार असलेल्यांना न्याय मिळवून देण्याची आमची इच्छा आहे. असं जयशंकर यांनी सांगितलं आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community