विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे २७ दिवस राहिलेले आहेत. इच्छूकांना त्यांची उमेदवारी निश्चित होऊन प्रचाराच्या कामाला लागायचे आहे. उशिरा उमेदवारी जाहीर केल्याने काय नुकसान होते हे महायुतीने (Mahayuti) लोकसभेत अनुभवले, त्यामुळेच विधानसभेत ही चूक सुधारत महायुतीने १८२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याउलट मविआचा (MVA) मात्र एकही उमेदवार जाहीर झालेला नाही. मविआतील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही.
(हेही वाचा माहीमची लढत ठरली; Amit Thacheray यांना दोघांचे आव्हान)
…तर मविआला नुकसान होणार
आजपासून बरोबर एक महिन्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या सगळ्यात उमेदवार यादी जाहीर करण्यात महायुतीने (Mahayuti) म्हणजेच भाजपा, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी या पक्षांनी धडाका लावत आतापर्यंत १८२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र महाविकास आघाडीने (MVA) अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. जागावाटपाचा त्यांचा पेच सुटणार का? हा प्रश्न आहे. मविआमध्ये (MVA) जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे वृत्त केवळ माध्यमांमधून येत आहे. काँग्रेस १०५, उबाठा ९५ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ८५ असा हा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. अमुक दिवशी मविआची (MVA) पत्रकार परिषद होईल, अमुक दिवशी उमेदवारी यादी जाहीर होईल, अशीच चर्चा सुरु आहे. मात्र प्रत्यक्षात काहीच होताना दिसत नाही. त्यामुळे उमेदवार यादी उशिरा घोषित केल्याने जे नुकसान महायुतीला (Mahayuti) झाले, तेच नुकसान आता मविआला (MVA) सहन करावे लागणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community