गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण कोणत्या न् कोणत्या कारणांमुळे चांगलंच तापलं आहे. अशातच भाजप आणि सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तू-तू मै-मै सुरू आहे. दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला मुंबईतील बेस्ट बसेसवरून चांगलाच टोला लगावत सवाल उपस्थित केला आहे. शेलारांनी ट्वीट करून सेनेवर निशाणा साधत काही प्रश्न विचारले असल्याचे दिसतेय.
काय आहे शेलारांचे ट्वीट
रविवारी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी असे ट्वीट केले की, गेल्या पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या 185 गाड्या बेस्टने भंगारात काढल्यात..का? बेस्टमध्ये बसचा तुटवडा निर्माण करायचाय? 2800 कोटींचे टेंडर ज्याला दिले त्या पाकिस्तानी एजन्ट तुमूलुरीच्या कंपनीच्या ई बसची गरज निर्माण करायचीय? सारे काही त्या आंतरराष्ट्रीय घोटाळेबाजासाठी? ये ना चोलबे! असे एक न् अनेक सवाल शेलारांनी उपस्थित केले आहे.
(हेही वाचा – हिजाब बंदीचा निर्णय देणा-या न्यायाधीशांना धमकी देत आरोपी म्हणाला..)
◆पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या 185 गाड्या बेस्टने भंगारात काढल्यात..का?
◆बेस्टमध्ये बसचा तुटवडा निर्माण करायचाय?
◆2800 कोटींचे टेंडर ज्याला दिले त्या पाकिस्तानी एजन्ट तुमूलुरीच्या कंपनीच्या ई बसची गरज निर्माण करायचीय?
◆सारे काही त्या आंतरराष्ट्रीय घोटाळेबाजासाठी?
ये ना चोलबे!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 20, 2022
यावर शिवसेनेची काय भूमिका असणार?
येत्या काही काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात सुरु असलेल्या अनेक घडामोडींच्या मागे निवडणुकाच असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता या आरोपांवर मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असेलल्या शिवसेनेची काय भूमिका असणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ये ना चोलबे! असे म्हणत शेलारांचा सवाल
आशिष शेलार यांनी ‘पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या 185 गाड्या बेस्टने भंगारात काढल्यात..का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच पुढे त्यांनी अजूनही काही सवाल उपस्थित केले आहेत. “बेस्टमध्ये बसचा तुटवडा निर्माण करायचाय का? 2800 कोटींचे टेंडर ज्याला दिलं त्या पाकिस्तानी एजन्ट तुमूलुरीच्या कंपनीच्या ई बसची गरज निर्माण करायचीय का? सारे काही त्या आंतरराष्ट्रीय घोटाळेबाजासाठी सुरु आहे का? ये ना चोलबे!” असे सवाल करत शेलारांनी एक नवा मुद्दा उपस्थित केला आहे.
Join Our WhatsApp Community