नवीन संसदेच्या उदघाट्नावर १९ विरोधी पक्षाचा बहिष्कार; अमित शहा म्हणाले…

210
नवीन संसदेच्या उदघाट्नावर १९ विरोधी पक्षाचा बहिष्कार; अमित शहा म्हणाले...
नवीन संसदेच्या उदघाट्नावर १९ विरोधी पक्षाचा बहिष्कार; अमित शहा म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. एकूण १९ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन केले जावे, अशी मागणी यापूर्वीच केलेली आहे.

काँग्रेस, आम आदमी पार्टी (आप), तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), जनता दल-युनायटेड (जेडीयू), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी), समाजवादी पक्ष, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, करेला काँग्रेस मणी, विदुथलाई चिरुथाईगल कच्छी, राष्ट्रीय लोक दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स आणि क्रांतिकारी समाजवादी पक्ष यासह इतर मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्रग (MDK) कार्यक्रमात सहभागी होणार नाही.

(हेही वाचा – खेळ मराठी अस्मितेचा! १० कोटीसाठी मराठी चेअरचा प्रस्ताव १५ वर्षांपासून धूळ खात)

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘६० हजार श्रमयोगींनी विक्रमी वेळेत नवीन संसद भवनाचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्यामुळे पंतप्रधान यावेळी सर्व श्रमयोगींचाही सन्मान करणार आहेत. अशा बाबतीत विरोधकांकडून राजकारण केले जाणार हे माहित आहे. पण आम्ही सर्वांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे.

अमित शहा म्हणाले की, ‘नव्या संसदेत सेंगोल (राजदंड) ठेवण्यात येणार आहे. याचा अर्थ संपत्तीने संपन्न. ज्या दिवशी संसद राष्ट्राला समर्पित होईल, त्या दिवशी तामिळनाडूत आलेले विद्वान हे सेंगोल पंतप्रधानांना देतील. तो संसदेत मांडला जाईल. सेंगोलला यापूर्वी अलाहाबादमध्ये ठेवण्यात आले होते.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.