केवळ याकूब मेमनच नाही, तर महाराष्ट्रातील ‘या’ गड-किल्ल्यांवरही कबरी उभारल्यात!

232

मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावल्या अतिरेकी याकूब मेमनला मुंबईत बडा कबरस्थान येथे त्याला दफन करण्यात आले. मुस्लिम कबरस्तानमध्ये दफन केलेली कबर १८ महिन्यानंतर पुन्हा खोदली जाते आणि त्या ठिकाणी दुसरा मृतदेह दफन केला जातो. परंतु बडा कबरस्थान येथे याकूबची कबर कायमस्वरूपात बांधण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. मात्र अशा बेकायदेशीर कबरी केवळ बडा कबरस्तानमध्येच बांधलेली नाही, तर राज्यातील गड-किल्ल्यांवरही कबरी बांधण्यात आल्या आहेत, आता त्यावरही कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

yakub menon

(हेही वाचा रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर…)

बडा कबरस्तानातील अतिरेकी याकूब मेमन याची कबर हटवली पाहिजे, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी बेकायदेशीर कबरी, मजार, मशिदीचा विषयदेखील चर्चेत आला आहे. ‘हिंदुस्थान पोस्ट’नेही जानेवारी २०२२ मध्ये राज्यातील ज्या ज्या गड-किल्ल्यांवर अनधिकृत थडगी, कबरी, मजार आणि मशिदी उभारण्यात आली आहेत, त्याची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्य मिळवण्यासाठी मुघल साम्राज्याशी लढा दिला, त्यानंतर मराठा राजे, पेशव्यांनीही मुस्लिम आक्रमकर्त्यांशी दोन हात करून राज्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन केले, आज त्याच गड-किल्ल्यांवर बेकायदेशीर थडगी आणि कबरी उभारली जात आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने आता या गड-किल्ल्यांवरील थडगीही हटवली पाहिजेत, अशी मागणी होत आहे.

(हेही वाचा दहशतवादी याकूबची कबर कोणी सजवली? महापालिका आयुक्त म्हणतात…)

शिवडी किल्ल्यावर दर्गा!

शिवडी येथील किल्ला १५०० शतकात बांधलेला आहे. या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर सैय्यद जलाल शाह दर्ग्याचे प्रस्थ वाढत आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर साधारण १ एकर जागेत दरगाह शरीफ हजरत सैय्यद जलाल शाह या नावाने दर्गा आणि त्याच्याशी संबंधित वास्तू बांधण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांपासून येथे नवीन बांधकाम करण्यात आले आहे, मात्र याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत शिवडी किल्ला येतो. या दर्ग्याचे ठिकाण हे नवनाथांपैकी एका नाथांचे स्थान असल्याचे येथील जाणकार वृद्ध मंडळी सांगतात.

shivdi killa1

 लोहगडावर भरवला जातो उरुस 

लोहगड किल्ला हे प्राचीन स्मारक असून त्यावर कोणत्याही प्रकारे धार्मिक कार्यक्रमाला अनुमती नाही. ‘प्राचीन स्मारक आणि त्याच्या परिसरात उरूस शरीफ साजरा करण्यासाठी अनुमती देण्यात येऊ नये’, असा स्पष्ट आदेश १३ डिसेंबर २०१८ या दिवशी भारतीय पुरातत्व विभागाकडून मुंबई विभागाच्या अधीक्षकांना देण्यात आला आहे. हा आदेश डावलून प्रतिवषी लोहगडावर उरूस साजरा केला जात आहे. यंदाच्या वर्षीही या गडावर मंडप उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिस आणि पुरातत्व विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी या गडाची पाहणी केली तरीही त्या मंडपावर कारवाई करण्याची हिमंत दाखवलेली नाही.

(हेही वाचा मुंबईत दहशतवादी याकूब मेननच्या कबरीचे उद्दात्तीकरण, कबरीचे मजारमध्ये रूपांतर?)

lohgad

कुलाबा किल्ल्यावर बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर

रायगड जिल्ह्यातील अलीबाग येथील कुलाबा किल्ल्यावर अवैधरित्या बांधण्यात आलेल्या थडग्याकडेही कानाडोळा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गडावर असलेल्या पुरातत्व विभागाच्या कार्यालयाच्या जवळच सिमेंट आणि लाद्या यांचा वापर करून पक्के बांधकाम करून थडगे उभारण्यात आले आहे. त्यामुळे गड – किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी असलेला पुरातत्व विभागाच या अशा अवैध बांधकामांना पाठिंबा देत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Kulaba 3

(हेही वाचा रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर…)

रायगड किल्ल्यावर मदार बनवण्याचा प्रयत्न 

रायगड किल्ल्यावर हिरवी चादर आणि हिरवा रंग देवून मदार बनवण्याचा प्रयत्न खासदार संभाजी राजे यांनी हाणून पाडला. हा प्रकार नुसता रायगड किल्ल्यापुरता मर्यादित नाही, तर राज्यातील बहुतांश शिवकालीन गड – किल्ल्यांचे इस्लामीकरण करून एक प्रकारे शिव पराक्रमाची विटंबना सुरू आहे.

raigad

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.