१ मे रोजी होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सभेने आतापासूनच रणकंदन माजवले आहे. गुरुवारी, २८ एप्रिल रोजी रात्री उशिरा पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला मंजुरी दिली. त्यानंतर लागलीच शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या औरंगाबादमध्ये ज्या मैदानावर सभा राज ठाकरे सभा घेणार आहेत, त्याच मैदानावर सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेनंतर शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुध्दा औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. याच सभेत शिवसेनेवर होणाऱ्या टीकेला त्याच भाषेत उत्तर देतील असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले. या सभेची तारीख सध्या सांगण्यात आली नसली, तरी उद्धव ठाकरे यांची उत्तर सभा नक्कीच औरंगाबादमध्ये होणार आणि मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच ही सभा होणार असल्याचे सुध्दा खैरे म्हणाले.
(हेही वाचा राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांच्या १६ अटी)
राज ठाकरेंच्या सभेला भाजपचा पाठिंबा
औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला भाजपचा पाठिंबा आहे. भाजपच्या काही नेत्यांनी सभेला लोक पाठवण्याबाबत सुद्धा बोलून दाखवले आहे, असेही खैरे म्हणाले. महाविकास आघाडीत बिघाडी आणण्यासाठी हे सर्व काही सुरू असल्याचे खैरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community