आनंदाची बातमी! सरकार मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेणार! 

राज्य सरकार ग्लोबल टेंडर काढणार असून त्यात रेमडेसिवीर इंजेक्शनासह, सीरम, भारत बायोटेक किंवा फायजर या कंपन्याच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचाही समावेश असणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी १ मेपासून देशभरात १८ वर्षांपेक्षा अधिक वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात करण्याची घोषणा केली. त्याची तयारी राज्य सरकारने केली असून १ मे हा महाराष्ट्र दिन आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोफत लसीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत. मोफत लस देण्याविषयी सरकार तयारी करत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

लसीकरणाची तयारी झाली! 

1 मेपासून लसीकरणाची व्याप्ती वाढणार आहे. त्यासाठी सरकारची तयारी झाली आहे. त्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार आहे. त्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा समावेश असणार आहे, त्यात सीरम, भारत बायोटेक किंवा फायजर अशा लसींचा समावेश असणार आहे. देशात महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. इतके दिवस आपल्या राज्याची जी गरज होती, ती भरुन काढण्यासाठी मुख्यमंत्री, आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशीही चर्चा केली. ऑक्सिजन टँकर विमानातून नेण्याची परवानगी दिली. रिकामे टँकर विमानातून नेण्यास परवानगी दिली. भरलेले टँकर रेल्वे, बाय रोड रो रो सेवेने येतील.

(हेही वाचा : आयसीयू फुल्ल मात्र ऑक्सिजन, सर्वसाधारण खाटा रिकामीच!)

बंद पडलेले ऑक्सिजनचे प्लांट सुरु करणार!

ऑक्सिजनबाबत जे बंद पडलेले प्लांट आहेत, ते सुरु करत आहोत. काही वीजेअभावी बंद होते, काही आर्थिक अडचणी बंद होते. ते सुरु करत आहोत. साखर कारखान्यांमध्येही ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही अजित पवार म्हणाले. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचा विचार करता डिस्चार्जची संख्या वाढत आहे. बरेच पेशंट रुग्णालयांमध्ये येत आहेत. आम्ही काही निर्णय लाँग टर्मसाठीही घेतोय. 18 ते 44 वयामध्ये लसीसाठी केंद्र राज्यांवर जबाबदारी देत आहे. आम्ही 5 जणांची कमिटी बनवत आहोत, असे अजित पवार यांनी नमूद केले.

गडकरींच्या भूमिकेचे स्वागत!

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे, मात्र दोन-तीन दिवसात औषध कंपन्या प्राधान्य देतील. परंतु केंद्राने पुन्हा त्यांचा ताबा घेतला आहे.  आमची केंद्राला विनंती आहे. आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणे झाले, त्यांनी विदर्भातील ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी घेतली, बाकीचे तुम्ही बघा, म्हटले आहे. गडकरींच्या भूमिकेचे स्वागत आहे. अशा प्रक्रारे वेगवेगळ्या भागातील नियोजन वाढले, तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही असेही पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here