पाचवा जनऔषधी दिवस रविवारी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने छत्रपती संभाजी नगर येथील आयएमए हॉलमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी जेनेरिक औषधांमुळे रुग्णांचे २० हजार कोटी रुपये वाचल्याचे सांगितले.
तसेच पुढे कराड म्हणाले की, ‘सामान्य रुग्णांना परवडणारी औषधे ही जेनेरिकची आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी देखील रुग्णांना परवडणारी औषधे द्यावीत अशा सुचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या आहेत. देशात जेनेरिक औषधांचे जवळपास ९००० दुकाने आहेत. त्या माध्यमातून मिळणारी औषधे ही ब्रँडेड औषधांपेक्षा ५० ते ९० टक्क्यांपर्यंत स्वस्त आहेत. तसेच ही औषध उच्च दर्जाची आहेत. या औषधामुळे देशातील रुग्णांचे २० हजार कोटी रुपये वाचले आहेत.’
छत्रपती संभाजी नगर झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक दयानंद मोतीपवळे, घाटीचे डॉ. कैलास झिने अन्न औषध प्रशासन सह आयुक्त गिरीश हुकरे, सहाय्यक आयुक्त संजय काळे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सचिन फडणीस, डॉ. उज्वला दहिफळे उपस्थित होते. यावेळी महिलांना औषधी साहित्य किट वाटप करण्यात आले.
(हेही वाचा – अटकेची मागणी होताच बच्चू कडूंचा माफीनाफा; काय आहे प्रकरण?)
Join Our WhatsApp Community