राज ठाकरेंना होणार अटक?

85

2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी बीडमधील परळी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अटक वॉरंट बाजवला आहे. परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केल्याप्रकरणी सध्या न्यायालयात केस सुरू असून जामीन करूनही सतत तारखांना हजर न राहिल्याने हे अजामीनपात्र वॉरंट त्यांना जारी कऱण्यात आलं आहे.

(हेही वाचा – आयकर विभागाची धाड! उत्तर प्रदेशासह महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी छापे)

मिळालेल्या माहितीनुसार, दुष्काळी दौऱ्याच्या निमित्ताने दौऱ्यावर निघालेल्या राज ठाकरे यांनी सहा वर्षांपूर्वी अंबाजोगाईत हजेरी लावली होती. न्यायालयात जाऊन त्यांनी त्यावेळी तीनशे रुपयांचा दंड भरून अटक वॉरंट रद्द केले होते. टिव्ही ९ मराठी या वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, साधारण १२ ते १३ वर्ष जुन्या खटल्यामध्ये आजही राज ठाकरेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. गेल्या ८ वर्षांपूर्वी बीडमधील अंबाजोगाईमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होऊनही राज ठाकरे सुनावणीला न्यायालयात गैरहजर होते.

असे आहे प्रकरण

रेल्वेमध्ये परप्रातीयांची भरती केली जात आहे, या संदर्भातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वक्तव्य केले होते. याप्रकऱणी 2008 मध्ये अटक करण्यात आली होती. ही अटक केल्यानंतर राज्यात अनेक ठिकणी पडसाद उमटले होते. त्यावेळी अंबाजोगाईत मनसैनिकांनी एसटी बसवर दगडफेक करून बसचे नुकसान केले होते. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राज ठाकरेंना जामीन मिळाल्यांनतर ते अंबाजोगाई न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे अंबाजोगाई न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.