स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात ७७ कामे जिल्हा प्रशासनाने मंजूर करून हाती घेतले आहे. त्यापैकी जिल्ह्यात २१ तलावांची निर्मिती करण्यात आली असून १५ ऑगस्ट रोजी यामधील काही तलावांचे भूमिपूजनही होणार आहे. तर उर्वरित कामे १५ ऑगस्ट २०२३ आधी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मृद व जलसंधारण विभागाने दिली आहे.
१५ ऑगस्टपूर्वी ७५ तलाव पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद मृद व जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग आणि वन विभाग यांच्या अंतर्गत ७७ तलावांची निर्मिती एका वर्षात करण्यात येणार आहे. ७५ तलावांचे उद्दिष्ट असताना जिल्हा प्रशासनाने वाढ करून ७७ तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री? Google च्या गोंधळामुळे नेटिझन्समध्ये चर्चा)
जिल्ह्यात सध्या अस्तत्विात असलेले तलाव, जलाशयांचे नूतनीकरण तसेच नवीन जलाशयांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, १५ वा वित्त आयोग, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आदी योजनांच्या संयोजनाने १५ ऑगस्टपूर्वी ७५ तलाव पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यात २१ तलावांची निर्मिती
याबाबत सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. अमृत सरोवराचे काम प्रकल्प आराखड्यात समाविष्ट करणे, गाव निवडताना स्वतंत्र हालचाली करणे, शहीद सैनिकांचे गाव प्राधान्याने निवडणे यासाठी जिल्हा जल आरक्षण अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेत लोकसहभाग व्यापक असावा. अमृत सरोवराचे भूमिपूजन स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या कामांना गती मिळावी, यादृष्टीने जिल्हा प्रशासन काम करीत आहे. त्यानुसार सद्यास्थितीत जिल्ह्यात २१ तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट रोजी या तलावांच्या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर टप्याटप्यात उर्वरित तलावांची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
Join Our WhatsApp Community