श्रावणी सोमवारसाठी MSRTC कडून त्र्यंबकेश्‍वरसाठी 230 बस

126

राज्यभरात श्रावणी सोमवार उत्साहाने साजरा केला जात आहे. श्रावण महिन्याच्या सोमवारनिमित्त भोलेनाथ, महादेवाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरला देखील भाविकांची मोठी गर्दी होताना दिसतेय. विशेष म्हणजे श्रावणी सोमवारनिमित्त फेरीसाठी भाविक देखील दाखल होत असतात. यामुळेच भाविकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे रविवार पासून २३० जादा गाड्या सोडण्यात येत आहे.

(हेही वाचा – Maharashtra Cabinet Expansion: कोट्यधीशांचे मंत्रिमंडळ! कोणत्या मंत्र्याकडे किती संपत्ती?)

MSRTC कडून दोन दिवस जादा बसेसची सोय

मिळालेल्या माहितीनुसार, या २३० बसेस जुन्या सीबीएससह अन्य विविध ठिकाणांहून बसेस सोडण्यात येणार आहे. रविवार, १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट या दोन दिवशी जादा बसेस उपलब्ध असणार आहेत. या दिवशी फेरीला मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होत असतात. रविवारपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविक त्र्यंबकेश्‍वर परिसरात दाखल होत असतात. या भाविकांची सुविधा लक्षात घेता MSRTC कडून दोन दिवस जादा बसगाड्यांतून भाविक प्रवाशांची वाहतूक केली जाणार आहे.

महामार्गावरून कोठे सुटणार बसेस

त्र्यंबकेश्‍वरसाठी जुन्या सीबीएसवरून बसगाड्या सुटणार आहेत. या बसस्‍थानकावरील अन्‍य मार्गांसाठीच्‍या बसगाड्या महामार्ग बसस्‍थानकावरून सुटणार आहेत. त्‍यानुसार सटाणा, साक्री, नंदुरबार, नवापूर, कळवण, सुरगाणा, सतशृंगगड, पेठ, ननाशी, राक्षसभुवन, केलावण, ओझरखेड, बाफनाविहीर, ठाणापाडा, हरसूल, बालापाडा, पिपळगाव, शिवणगाव, गणेशगाव, धुमोडी, बेजे, इगतपुरी, कुशेगाव, घोटीकरिता बसगाड्या महामार्ग बसस्‍थानकावरून सुटतील, असे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.