कोरोना चाचणी न केल्याने २५ आमदार विधिमंडळाबाहेर! 

अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही कोरोना चाचणी करावी लागणार असल्याचा संदेश संबंधित आमदारांपर्यंत पोहोचला नसल्याची माहिती समोर आली. 

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरही कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्याही सुरुवातीला सर्व आमदार, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. दोन आठवड्याच्या कालावधीतील या अधिवेशन काळात प्रत्येक आठवड्यात नव्याने चाचणी करण्याचे ठरवले होते. सोमवार, ८ मार्च रोजी दुसरा आठवडा सुरु झाला. त्यासाठी रविवारी चाचण्या करण्यात आल्या, मात्र २५ आमदारांनी ही चाचणी केलीच नाही, त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह २५ आमदारांना विधिमंडळाच्या बाहेर राहावे लागले.

सत्ताधारी पक्षांचे आमदार अर्थसंकल्पाच्या दिवशीच बाहेर! 

या २५ आमदारांमध्ये शिवसेना, काँग्रेसच्या आमदारांना समावेश आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र आमदारांनी कोरोना टेस्ट न केल्याने त्यांना आता सभागृहात हजर राहता येणार नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह 20-25 आमदारांना कोरोना टेस्ट न केल्याने त्यांना प्रवेश दिला गेलेला नाही.

(हेही वाचा : विधीमंडळ अधिवेशन प्रत्यक्ष, मग महापालिका सभागृह का नको?)

आरटीपीसीआर टेस्टनंतर देणार प्रवेश!   

दुसऱ्यांदा कोरोना टेस्ट करण्याची माहिती संबंधित आमदारांना दिलेली नव्हती. संवादाचा अभाव इथे दिसतो. आज अर्थसंकल्पाचा दिवस असल्याने त्यांना विधानभवनात बसण्याची परवानगी द्यायला हवी होती, असे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत सांगितले. 8 ते 10 आमदारांनी आतापर्यंत आरटीपीसीआर टेस्ट केली आहे. त्याचा रिपोर्ट आल्यावर त्यांना सभागृहात सोडण्यात येणार आहे, असेही आझमी म्हणाले. . संदेश पोहचला नाही!शुक्रवारी सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर शनिवार, रविवार सुट्टी होती. सोमवारी, ८ मार्च रोजी अधिवेशन सुरु झाले. त्यावेळी आमदारांनी पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक होते, मात्र काही आमदारांपर्यंत हा मेसेज न पोहोचल्याने त्यांनी पुन्हा चाचणी न करता अधिवेशनाला हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना परत पाठवण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here