१०० पैकी २६ टक्के मोदींची जादू! मोदी लाट अजून संपली नाही?

179

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणाचा चेहरा बदलून टाकला. मोदी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याआधी लोकांना राजकारणात इतका रस नव्हता. केवळ मतदान करणे किंवा नाक्यावर उभं राहून राजकारणाच्या गप्पा मारणे इतपत त्यांचं राजकारण सीमित होतं. परंतु २०१२ मध्ये हे चित्र बदललं. जणू नरेंद्र मोदींना निवडून देणं हे आपलं कर्तव्य झालं होतं. २०१२ नंतर विविध राजकीय विचारांचे लोक सोशल मीडियावर सक्रिय झाले. मोदींनी तर आपल्या नेत्यांना विशेषतः निवडून आलेल्या लोकांना त्यांनी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्याचे आदेश दिले.

मोदी निवडून आले तेव्हा ’मोदी लाट’ असं म्हटलं गेलं. मग २०१९ ला सेक्युलर जमातीतले डॅम्बिस पत्रकार मोदी लाट ओसरली म्हणून ढोल बडवत होते. परंतु २०१४ प्रमाणे ते २०१९ मध्ये देखील तोंडावर आपटले आणि मोदी लाट ओसरली नाही हे सिद्ध झालं. गुजरातमध्येही मोदी गेल्यानंतर पुन्हा भाजपाची सत्ता आली. ती देखील मोदींची जादू म्हणावी लागेल. नरेंद्र मोदींनी केलेल्या कामाच्या बळावर जनतेने गुजरातमध्ये भाजपला निवडून दिलं.

आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये निवडणूकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कॉंग्रेस, आप आणि भाजपा अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने सत्ता स्थापन केल्यानंतर केजरीवाल वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपली ताकद तपासून पाहत आहेत. गोव्यामध्ये त्यांची “फुकट फाकट मित्र मंडळ” म्हणजे सगळंच फुकट देण्याची जादू चालली नाही. आता त्यांनी गुजरातमध्ये जोर लावला आहे.

( हेही वाचा: 7th Pay Commission: वेतन सुधारणा समिती २०२२ समोर बाजू मांडण्याचा महापालिका कामगार आणि संघटनांसाठी शेवटचा दिवस )

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी सी वोटर सर्व्हे आला आहे. यात जी माहिती देण्यात आली आहे, त्यावरुन पुन्हा एकदा मोदींची जादू चालण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये कोणत्या आधारावर मतदान होईल, यावर सर्व्हे केला असता; धर्म : १४ टक्के, जात : १४ टक्के, विकास : ३३ टक्के, मोदी : २६ टक्के आणि इतर बाबी: १३ टक्के. म्हणजे अजूनही मोदी लाट ओसरलेली नाही. २६ टक्के हा मोठा आकडा आहे. त्यात गुजरातमध्ये आलेले नवनवीन प्रकल्प म्हणजे विकास हा घटक देखील महत्वाचा ठरणार आहे. अशातच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करून हिंदुत्ववादी मतदारांना अलर्ट केले आहे. त्यामुळे गुजरातच्या जनतेचा कौल मोदींकडे राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता गुजरातमध्ये कॉंग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यांची तोंडे पाहता कॉंग्रेस हरण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. केजरीवाल काय चमत्कार करतात हे पाहावे लागणार आहे. परंतु या सर्व्हेतला मला २६% हा आकडा खूप महत्वाचा वाटतो. मोदी लाट अजूनही ओसरली नाही याचा हा पुरावाच आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.