शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदेंनी बंड करून राज्यात भाजपसह सत्ता स्थापन केली. एकीकडे राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा मिळत असल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे. कित्येक आमदारांनंतर आता खासदारही शिंदे गटात सहभागी होण्याच्या दिशेने आहेत. अनेक नगरसेवक, पदाधिकारी आता शिंदे गटात सामील होताना दिसताय. अशातच आता शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
‘या’ ३ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत गणेश नाईकांनी शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटातील तीन नगरसेवकांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. आज, मंगळवारी नवी मुंबईतील दिघा येथील नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते यांनी पुन्हा भाजपमध्ये दाखल होत कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे शिंदे गटात आमदार आणि खासदारांचं इन्कमिंग सुरूच आहे, असे असतानाही शिंदे गटातील नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यात गणेश नाईक यशस्वी झाले असल्याचे म्हटले जात आहे.
(हेही वाचा – शिवसेनेच्या बारा खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट)
तिन्ही नगरसेवकांची भाजपात घर वापसी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते. परंतु आता राज्यात पुन्हा शिंदे आणि भाजप सरकार आल्याने तिन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये घर वापसी केली आहे.
Join Our WhatsApp Community