२०२४ लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha election 2024) प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील नलबारी (Aasam Nalbari) येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले की, आजचा दिवस रामनवमीचा (Ramnavmi) आहे आणि हे ऐतिहासिक पर्व आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. एनडीएने देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील ५ वर्षात आणखी ३ कोटी नवीन घरे बांधली जातील, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी सभेतील जनतेला दिले. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मुंबईत उद्धव ठाकरेंना बसणार फटका; महायुतीला किती जागा मिळणार? जाणून घ्या ओपनियन पोल… )
ही निवडणूक म्हणजे विकसित भारत आणि विकसित बिहार या एकाच संकल्पाची निवडणूक
या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील गया येथे निवडणूक रॅलीला (Bihar Election Rally) संबोधित केले होते. यावेळी ते म्हणाले होते की, ही ती भूमी आहे जिने मगधचे ऐश्वर्य पाहिले आहे, बिहारचे वैभव पाहिले आहे. योगायोगाने मी गयाला आलो तेव्हा नवरात्री आहे आणि सम्राट अशोकाची जयंतीही आहे. शतकांनंतर, पुन्हा एकदा भारत आणि बिहार त्यांचे प्राचीन वैभव परत करण्यासाठी पुढे जात आहेत. याशिवाय ही निवडणूक म्हणजे विकसित भारत आणि विकसित बिहार या एकाच संकल्पाची निवडणूक आहे. गयाच्या भूमीवर जमलेली ही गर्दी, हा प्रचंड जनसमर्थन स्पष्टपणे सांगत आहे – पुन्हा एकदा मोदी सरकार. अवघ्या २ दिवसांपूर्वी भाजपने आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार )