विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई जिल्ह्यातील ३६ जागांपैकी १८ जागांवर माजी नगरसेवकांनी वेगवेगळ्या जागांवर निवडणूक लढवून नशीब आजमावत होते. त्यातील फक्त तीन नगरसेवकांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली असून १५ माजी नगरसेवकांचा दारूण पराभव झालेला आहे. विजयी माजी नगरसेवकांमध्ये जोगेश्वरी विधानसभेतून शिवसेना (उबाठा) पक्षाचे अनंत नर(Anant B. Nar), भायखळा विधानसभेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे मनोज जामसुतकर (Manoj Jamsutkar) आणि भाजपाचे माजी नगरसेवक मुरजी पटेल (उमेदवार शिवसेना) अशा तीन जणांचा विजय झाला आहे. ते आता शपथविधीनंतर नवनिर्वाचित आमदार होतील. मात्र विविध पक्षाचे तब्बल १५ माजी नगरसेवक हे पराभूत झालेले आहेत. त्यांना अपेक्षित मतदान झालेले नाही. (Maharashtra Election Results 2024)
या सर्व माजी नगरसेवकांपैकी श्रद्धा जाधव (Shraddha Jadhav) आणि आसिफ झकेरिया (Asif Zakaria) हे वगळता (यापूर्वीही पराभूत) बाकीच्या सर्व माजी नगरसेवकांना प्रथमच आमदार होण्याची संधी मिळाली होती. मात्र १८ पैकी फक्त ३ माजी नगसेवक आमदार झालेत तर १५ माजी नगरसेवकांचा पराभव झाला आहे. त्यात निवडणुकीत हार पत्करावी लागल्याने आणि निवडणूक खर्चापोटी त्यांना मोठा आर्थिक फटकाही बसला आहे.(Maharashtra Election Results 2024)
पराभूत झालेले माजी नगरसेवक (Maharashtra Election Results 2024)
विनोद शेलार- मालाड विधानसभा (भाजपा)
राजू पेडणेकर – वर्सेावा विधानसभा (अपक्ष)
राखी जाधव- घाटकोपर विधानसभा (राष्ट्रवादी – श.प)
सुवर्णा करंजे- विक्रोळी विधानसभा (शिवसेना)
आसिफ झकारिया- वांद्रे पश्चिम (काँग्रेस)
श्रद्धा जाधव- वडाळा विधानसभा (शिवसेना- उबाठा)
स्नेहल जाधव- वडाळा विधानसभा (मनसे)
संदीप देशपांडे- वरळी विधानसभा (मनसे)
संजय भालेराव- घाटकोपर विधानसभा (शिवसेना- उबाठा)
भालचंद्र अंबुरे – जोगेश्वरी विधानसभा (मनसे)
समीर देसाई- गोरेगाव विधानसभा (शिवसेना- उबाठा)
महंमद सिराज शेख- मानखुर्द विधानसभा (वंचित)
सुरेश (बुलेट) पाटील -मानखुर्द विधानसभा (शिवसेना)
नाना आंबोले- शिवडी विधानसभा (अपक्ष- माजी भाजपा नगरसेवक)
प्रवीणा मोरजकर- कुर्ला विधानसभा (शिवसेना- उबाठा)