विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या ३ उमेदवारांची नावे जाहीर

86

राज्यात जानेवारी महिन्यात विधान परिषद निवडणूक होत आहे. त्यासाठी 5 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सोमवार, ९ जानेवारी रोजी भाजपने 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांच्या समन्वयाने विधानपरिषदेच्या ५ जागा लढविल्या जाणार आहेत, असे सांगितले.

ना गो गाणार यांना तिसऱ्यांदा संधी? 

कोकण विधान परिषदेकरीता ज्ञानेश्वर म्हात्रे, पश्चिम विदर्भातून रणजीत पाटील आणि मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नाशिक विधानपरिषद संदर्भात एक दोन दिवसांत निर्णय होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली असताना भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवार ठरत नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता तर मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप प्रणित ना.गो. गाणार हे गेली दोन टर्म आमदार आहे. शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक भाजप थेट न लढता शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा देतात. मात्र गेल्या काही दिवसात भाजपने ही निवडणूक स्वतः लढवावी असा सूर नेत्यांचा होता. त्यामुळे भाजपदेखील अनेक नेते उमेदवारीसाठी इच्छुक होते. कल्पना पांडे, अनिल शिवणकर यांनी यासाठी कामाला देखील सुरुवात केली होती. तरी शिक्षण परिषदेने ना.गो. गाणार यांना तिसऱ्यांदा संधी देत उमेदवारी घोषित केली.

(हेही वाचा दादरमधील मुस्लिम फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनात भाजपमध्येच फूट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.