पश्चिम बंगालमध्ये TMC च्या नेत्यासह तिघांची गोळ्या घालून हत्या

86

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कॅनिंग भागात गुरुवारी पहाटे तृणमूल पंचायत समिती सदस्यासह तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना गोपाळपूरची असून गुरूवारी सकाळी तृणमूल नेते आपल्या दोन साथीदारांसह घरातून दुचाकीवरून निघाले असताना हे तिहेरी हत्याकांड घडले. स्वपन मांझी असे मृत पंचायत सदस्य नेत्याचे नाव आहे.

(हेही वाचा – मुंबईकरांनो! CSMT ते वडाळा रेल्वे वाहतूक बंद; हार्बर मार्गावर 2 तासांचा विशेष ब्लॉक)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी स्वपन मांझी पहाटेच पक्ष कार्यालयात जाण्यासाठी घरातून निघाले होते. त्याच्यासोबत त्यांचे आणखी दोन साथीदार होते. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना वाटेत घेरले आणि गोळ्या झाडल्या. त्यांच्या दोन्ही साथीदारांनाही गोळ्या लागल्या.

असाही केला जात आहे दावा

हल्लेखोर त्यांचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न करत होते पण बॉम्ब आणि गोळ्यांचा आवाज ऐकून स्थानिक लोक आले, त्यानंतर हल्लेखोर पळून गेले, असा दावा केला जात आहे. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि तिघांचे मृतदेह उचलून तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. हल्ला कोणी केला आणि त्यामागचे कारण काय, याचा तपास पोलीस पथकाकडून सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.