Deepak Kesarkar : राज्यात ३ हजार २१४ मुले शाळाबाह्य; दीपक केसरकर यांची कबुली

नवीन शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी अर्थात बालवाटिका हे धोरण अंमलात आणले जाणार आहे.

193
Deepak Kesarkar : विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी
Deepak Kesarkar : विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी

राज्यातील ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात १ हजार ६२४ मुले तर १ हजार ५९० मुली अशी एकूण ३ हजार २१४ मुले शाळाबाह्य आढळून आल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सोमवारी (११ डिसेंबर) विधानसभेत दिली. (Deepak Kesarkar)

सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एकट्या मुंबईत एकूण ३५६ बालके शाळाबाह्य आढळले असून त्यांना शाळेत दाखल करण्यात आले आहे. तर ठाणे जिल्ह्यात ३८० बालके शाळाबाह्य आढळून आल्याची माहिती दिली. (Deepak Kesarkar)

(हेही वाचा – Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत विराट कोहली निर्णायक भूमिका बजावेल, कॅलिसला विश्वास)

दरम्यान, यावेळी शिक्षक भरती आणि २० पेक्षा कमी पटसंख्या असलेली शाळा बंद करण्याच्या निर्णयावर सर्वपक्षीय सदस्यांनी उपप्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तरे देताना केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राज्यात पुढील वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले. या धोरणात पूर्व प्राथमिक नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी अर्थात बालवाटिका हे धोरण अंमलात आणले जाणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार नाही. (Deepak Kesarkar)

तसेच सरकारने ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची बिंदूनामावली तपासण्याचे काम सुरु आहे. बिंदूनामावली अंतिम झाल्यानंतर येत्या दोन महिन्यात संबंधित शिक्षकांना त्या-त्या जिल्ह्यात नियुक्त्या दिल्या जातील. तसेच शाळाबाह्य आणि विटभट्ट्यांवर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात नगरविकास विभाग, शालेय शिक्षण तसेच महिला व बालकल्याण विभाग यांच्यात समन्वय राखला जाईल, असेही केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले. (Deepak Kesarkar)

(हेही वाचा – Article 370 : ३७० कलम हटविल्यानंतर जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था किती वाढली?)

मध्यान्ह भोजन योजनेची तपासणी

दरम्यान, ग्रामीण भागाप्रमाणे आता शहरी भागातही शिजलेल्या मध्यान्ह भोजनाची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. (Deepak Kesarkar)

चेंबूर येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनेतून ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या विषबाधेबाबत समाजवादी पक्षाच्या अबू आझमी (Abu Azmi) यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर (Deepak Kesarkar) यांनी त्या दिवशी हिंदी माध्यमाच्या १८९ तर मराठी माध्यमाच्या ५१ विद्यार्थ्यांनी १ मध्यान्ह भोजनेचा लाभ घेतला होता. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर आपण सेंट्रल किचनला भेट देणार असून ग्रामीण भागात जसे अन्न तपासले जाते तेच सूत्र आता शहरी भागातही लागू केले जाईल, असे केसरकर यांनी सांगितले. (Deepak Kesarkar)

दरम्यान, या घटनेच्या संदर्भातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा लवकरात लवकर अहवाल मागून घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. यावेळी वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण, समाधान औताडे, मनीषा चौधरी आदींनी उपप्रश्न विचारले. (Deepak Kesarkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.