पुढील ३ महिन्यात ३० हजार शिक्षक भरती होणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती

30 thousand teacher recruitment in 3 months said devendra fadnavis
पुढील ३ महिन्यात ३० हजार शिक्षक भरती होणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती

शिक्षक भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. पुढील ३ महिन्यात ३० हजार शिक्षक भरती करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. यापूर्वी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात ३० हजार पदे भरली जातील असे सांगितले होते.

औरंगाबाद, संभाजीनगर मराठवाडा शिक्षक मेळाव्यातून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फक्त निवडणुका म्हणून घोषणा करायची अशा प्रकारची घोषणा आम्ही करत नाही. २०१२पासून शिक्षक भरती बंद होती. ती भरती आम्ही सुरू केली असून पुढील ३ महिन्यात ३० हजार शिक्षक भरती करणार आहोत. दरम्यान यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचा नियोजन विभागाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर विविध जिल्ह्यांच्या आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्यासह विविध मंत्री उपस्थित होते.

दरम्यान या मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘सर्वच जिल्ह्याने वाढीव मागण्या केल्या असून त्या पूर्ण करता येणे शक्य आहे. त्या पूर्ण केल्याही जातील. सध्या आचारसंहिता असल्यामुळे त्याची त्यासंबंधित घोषणा करता येणे शक्य नाही.’

(हेही वाचा – By Election 2023: कसबा पेठेसह चिंचवडमधून भाजपकडून कोणता उमेदवार लढणार? सांगितलं चंद्रकांत पाटलांनी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here