पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय ३०० शब्दांच्या निबंधाची शिक्षा अशक्य: Pune Porsche car Accident वर Raj Thackeray यांची अमेरिकेतून टीका

77
पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय ३०० शब्दांच्या निबंधाची शिक्षा अशक्य: Pune Porsche car Accident वर Raj Thackeray यांची अमेरिकेतून टीका
पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय ३०० शब्दांच्या निबंधाची शिक्षा अशक्य: Pune Porsche car Accident वर Raj Thackeray यांची अमेरिकेतून टीका

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाला (Brihanmaharashtra Marathi Board, America) मुलाखत दिली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी पुण्यातील अपघात प्रकरणावर संताप व्यक्त करत त्यांनी व्यवस्थेबाबतचा रागही व्यक्त केला. तसेच बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला भीषण अपघाताची शिक्षा म्हणून निबंध लिहिण्यास सांगणे, हे पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय शक्यच नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. (Pune Porsche car Accident)

(हेही वाचा – Chief Electoral Officer यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी; विधानपरिषदेच्या निवडणुकीची तयारी)

पुण्याच्या अपघातात सर्वजण बिल्डरचा मुलगा, बिल्डर आणि त्याचा बाप, त्या अल्पवयीन मुलाची आई यांच्याबाबतच बोलत आहेत. त्या मुलाने ज्या दोन जणांना चिरडले त्या दोघांबाबत कोणच बोलत नाहीय. त्यांच्या आई वडिलांबाबत बोलत नाही. धक्कादायक म्हणजे ती केस कोर्टात गेल्यावर तेथील जज त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगतो. हा कोणता न्यायाधीश आहे. पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय अशा प्रकारची शिक्षा न्यायालयात होऊ शकत नाही. यानंतर तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार, पोलीस, कोर्ट की सरकारवर असा सवाल राज यांनी उपस्थित केला. जनतेचा विश्वासच उडाला तर आराजकाकडेच जाणार, असा इशाराही राज  (Raj Thackeray) यांनी दिला.  (Pune Porsche car Accident)

(हेही वाचा – महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिला अधिकारी; Sujata Saunik स्वीकारणार पदभार)

पुण्यात नेमकी काय घटना घडली होती?

एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी ११० किमीच्या वेगाने पोर्श कार चालवत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली होती. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. तर अश्विनी कोस्टा त्याची मैत्रीण होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. मित्रांसह डिनरला गेले होते. हे दोघे बाईकवरुन निघाले त्यानंतर काही सेकंदातच भरधाव वेगात आलेल्या पोर्शने या दोघांना धडक दिली. ज्यात या दोघांचा मृत्यू झाला होता. (Pune Porsche car Accident)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.