चिंचवड पोटनिवडणुकीत ३३ उमेदवार

122

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीएकूण ४० जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्या सर्व अर्जांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी, ८ फेब्रुवारी छाननी केली. त्यामध्ये सात जणांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामध्ये आम आदमी पार्टीच्या उमेदवाराचाही समावेश आहे. उर्वरित ३३ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. आता अर्ज माघारीसाठी दोन दिवस देण्यात आले आहेत. शुक्रवारी, १० फेब्रुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेता येतील. त्यानंतर निवडणूक रिंगणात कोण कोण असतील हे स्पष्ट होईल.

भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. या मुदतीत एकूण ४० जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, त्यांचे बंधू शंकर जगताप यांचा डमी अर्ज, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांच्यासह अॅड. अनिल बाबू सोनावणे, मिलिंद कांबळे, अजय हनुमंत लोंढे, रफिक रशिद कुरेशी, मोहन भागवत म्हस्के, रवींद्र विनायक पारधे, बालाजी लक्ष्मण जगताप, गोपाळ यशवंत तंतरपाळे, अमोल (देविका) अशोक सूर्यवंशी, सिद्धीक इस्माईल शेख, किशोर आत्माराम काशीकर, डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले, सोयलशहा युनुसशहा शेख, हरिश भिकोबा मोरे, जावेद रशिद शेख, राजेंद्र मारुती काटे, श्रीधर नारायण साळवे, राजू बबन काळे, विठ्ठल कृष्णाजी काटे, सतिश श्रावण कांबिये, राहुल तानाजी कलाटे, चेतन मछिंद्र ढोरे, दादाराव किसान कांबळे, गणेश सुरेश जोशी, मनीषा मनोहर कारंडे, चंद्रकांत रंभाजी मोटे, सुधीर लक्ष्मण जगताप, तुषार दिगंबर लोंढे, प्रविण अशोक कदम, मनोहर नामदेव पाटील, प्रफुल्ला शैलेंद्र मोतिलिंग, मनोज मधुकर खंडागळे, उमेश महादेव म्हेत्रे, भाऊ रामचंद्र अडागळे, सुभाष गोपाळराव बोधे, प्रकाश रामचंद्र बालवडकर, संजय भिकाजी मागाडे यांचा समावेश होता.

(हेही वाचा स्टार्टअपमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक – पंतप्रधान नरेंद्र मोदी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.