केंद्राकडे अडकले राज्याचे ३३ हजार ३५२ कोटी!

राज्याचे पैसे केंद्राकडे अडकल्याने राज्याची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे राज्याने आता थेट अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून संसदीय पातळीवर या विषयाकडे लक्ष वेधून घेतले आहे.

127

जीएसटी पोटी केंद्राकडून महाराष्ट्राला ३३ हजार ३५२ कोटींचा परतावा आजपर्यंत मिळाला नसल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली. जीएसटी संदर्भातील विधेयक आज परिषदेच्या पटलावर मांडण्यात आले, यावेळी अजित पवार विधान परिषदेत बोलत होते. 

जीएसटीचे २०२१ चे सुधारणा विधेयक विधान परिषदेत मांडले! 

गेल्या वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. राज्यात सातत्याने लावण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. केंद्राकडून राज्याला मिळणारा जीएसटीचा परतावाही मागील तीन वर्षांपासून थकला आहे. जीएसटीचे २०२१ चे विधानसभेने मंजूर केलेले सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मांडण्यात आले. काँग्रेसचे सदस्य शरद रणपिसे यांनी, केंद्राकडे आजपर्यंत किती रुपयांची थकबाकी आहे, याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, सन २०१९ मध्ये १ हजार २९ कोटी, सन २०२० मध्ये १ हजार ९३ कोटी आणि सन २०२१ मध्ये ९ हजार १३० असे एकूण आजपर्यंत महाराष्ट्र राज्याचे ३० हजार ३५२ कोटी रुपये थकीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषद दिली. राज्याचे पैसे केंद्राकडे अडकल्याने राज्याची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे राज्याने आता थेट अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून संसदीय पातळीवर या विषयाकडे लक्ष वेधून घेतले आहे. 

(हेही वाचा : पहिल्या दिवशी परिषदेतही गाजले हे महत्वाचे मुद्दे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.