लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास आज, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. अमरावतीचे विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली या कामांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – औरंगाबाद की संभाजीनगर? नामांतरणाची लढाई आता न्यायालयात होणार)
ही कामे करण्यात येणार
यामध्ये लोणार सरोवर परिसरात मंदिराचे जतन, निसर्ग पर्यटन, वन्यजीव संरक्षण, सरोवराभोवती पदपथ, रस्त्यांचे भूसंपादन, अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन अशी विविध कामे विविध कामे केली जातील. लोणार सरोवर जागतीक पातळीवरील पर्यटन स्थळ असून मागील अनेक दिवसांपासून याच्या संवर्धनासाठी निधीची मागणी होत होती. आज ती मागणी मान्य झाली आहे.
नियोजन विभागाने मंजूर आराखडयातील कामनिहाय आवश्यक निधी लोणार सरोवर विकास समितीकरीता पीएलए खाते तयार करुन त्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, ज्या विभागांना राज्याच्या अर्थसंकल्पा व्यतिरिक्त इतर स्त्रोतातून निधी प्राप्त होतो ज्याची तरतूद नियोजन विभागामार्फत करणे शक्य नाही तसेच तांत्रिक कारणामुळे निधी लोणार सरोवर विकास समितीकडे वर्ग करण्याची बाब शक्य नसल्यास, अशा प्रकरणी संबंधित विभागाने आराखडयातील कामे प्रचलित पध्दतीनुसार समितीच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community