येत्या ३० जानेवारीला राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिक पदवीधर मतदारसंघ सर्वाधिक चर्चेचा ठरला. कारण काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही आणि त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. आता नाशिक मतदारसंघातील निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील आणि सुरेश पवार असा सामना रंगणार आहे. जिंकून येण्यासाठी उमेदवारांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान डॉ. सुधीर तांबे यांनी सत्यजित तांबेंना ४० ते ५० संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
एका खासगी मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना सुधीर तांबे म्हणाले की, ‘आमचं सर्वत्र फिरून झालेलं आहे. अतिशय उत्तम प्रतिसाद सर्वत्र आहे. ठिकठिकाणी मेळावे सुरू आहेत. आतापर्यंत ४० ते ५० संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. रोज मला फोन येतायत की, आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे. सर्व क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे.’
सत्यजित तांबे म्हणजे औरंगजेब
संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी एका खासगी मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना सत्यजित तांबेंवर घणाघात केला आहे. ‘ज्याप्रमाणे औरंगजेबानं स्वतःच्या वडिलांनाही सोडलं नव्हतं, त्याप्रमाणे सत्यजित तांबेंनी स्वतःच्या वडिलांनाच खुर्चीवरून खाली खेचलं,’ असं सुरेश पवार म्हणाले.
(हेही वाचा – माजी मुख्यमंत्र्यांचा टोमणे मारणं हाच पराक्रम; मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंवर टीका)
Join Our WhatsApp Community