उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) हापुड जिल्ह्यात मुस्लिम समुदायातील ४५ कुटुंबांनी सनातन धर्मात घरवापसी केली आहे. घरवापसी करणाऱ्यांमध्ये १५० लोकांचा समावेश आहे. दि. ११ डिसेंबर रोजी या सर्वांनी घरात मृत्यू झालेल्या सदस्यावर हिंदू पद्धतीनुसार अत्यसंस्कार केले. घरवापसी करणाऱ्यांनी सांगितले की, त्यांचे पूर्वज हिंदू (Hindu) होते, मात्र मुघलांच्या अत्याचाला कंटाळून त्यांच्या पूर्वजांनी धर्मांतर केले.
( हेही वाचा : मुसलमान म्हणतात, काँग्रेस आणि शरद पवारांनी UBT सोबतचे संबंध तोडावेत)
वृत्तंसस्थेने दिलेल्या माहितीनुसार, घरवापसी करणारे कुटुंबं दिल्लीत राहत होते. त्यांनी आपले मूळ गाव पाकिस्तानातील राजधानी इस्लामाबाद (Islamabad) असल्याचे सांगितले. १९४७ रोजी फाळणीनंतर त्यांचे पूर्वज भारतात येऊन स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे वास्तव्य केले. मात्र या कुटुंबियांना माहिती होते की, त्यांचे पूर्वज हिंदू होते, मात्र मुघलांच्या अत्याचामुळे त्यांनी इस्लाम धर्म कबूल केला होता.
अंदाजे ४ वर्षांपूर्वी या कुटुंबानी हिंदू (Hindu) धर्मात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांना मुस्लिम समुदायाकडून भरपूर विरोध झाला. तरीही हे कुटुंब घरवापसीचा प्रयत्न करत होते. त्यातच एका ज्येष्ठाचा कुटुंबात मृत्यू झाला. तेव्हा सर्व कुटुंबिय ज्येष्ठाच्या अंत्यसंस्काराला पोहचले. तेव्हा हिंदू (Hindu) पद्धतीने मृतकावर अत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
अंत्यसंस्कारानंतर मृतकाच्या अस्थी गंगेत प्रवाहित करण्यात आला. या सर्वांनी जीवनात पहिल्यांदाच गंगा स्नान केले. इस्लाम (Islam) धर्म सोडून घरवापसी करणाऱ्या मुस्लिम समाजाच्या प्रमुखांमध्ये सलमान खान होते, ज्यांचे घरवापसीनंतर संसार सिंह असे नाव झाले आहे. त्यांनी १४९ लोकांसह मिळून भगवान शिव आणि माता पार्वती यांची आराधना केली. तसेच गौरीशंकर गोत्र त्यांनी अवलंबले. त्या सर्वांनी हिंदू (Hindu) धर्माचे उत्सव साजरा करण्याचे व्रत घेतले आहे. घरवापसी करणाऱ्यांमध्ये १५० सदस्यांनी बृजघाटच्या एका पुरोहिताकडून आपल्या वंशावळीची नोंद केली. तसेच सनातन धर्म स्विकारल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यामध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. (Hindu)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community