काँग्रेस (Congress) पक्षाच्या राज्य सहप्रभारींच्या समोरच जिल्हा बैठकीत पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. ही घटना जळगाव (Jalgaon) येथील जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घडली. पदाधिकारीच एकमेकांशी बाचाबाची करत असल्यामुळे पक्ष बैठकही गुंडाळण्यात आली. अमळनेरमधून विधानसभा निवडणूक लढलेले पराभूत उमेदवार डॉ. अनिल शिंदे (Dr. Anil Shinde) यांनी केंद्राच्या प्रभारींवर ५ लाख रुपये घेतल्यासह दारूच्या बाटल्या मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. याच वेळी जिल्हाध्यक्षांनाही २ लाख रूपये दिले, मात्र त्याची माझ्याकडे पावती आहे, असा आरोप शिंदे यांनी केला आहे.
सहप्रभारींच्या उपस्थितीत बैठकीत प्रोटोकॉल भंग केला म्हणून अनिल शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचवेळी अविनाश भालेराव व भगतसिंग पाटील यांच्यावरही कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत.
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा प्रभारी प्रतिभा शिंदे, शहराध्यक्ष श्याम तायडे, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, अविनाश भालेराव, भगतसिंग पाटील आदी उपस्थित होते. ही बैठक सुरू झाल्यानंतर काही जणांनी काँग्रेसचे सचिव संदीप यांच्याकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली. अनिल शिंदे पक्षाच्या वरिष्ठांनाही जुमानत नाही, ते घमेंडी आहेत, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची तक्रार आहे.
काय आहे प्रकरण ?
काँग्रेसच्या (Congress) बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी आपण बैठकीचे अध्यक्ष आहोत, कोणी बोलायचे, हे आपण ठरवणार असल्याचे सांगत जो आपले ऐकणार नाही, त्यांना सभागृहाच्या बाहेर जावे लागेल, असे जाहीर केले. त्यांच्या या बोलण्यावरून सुरू झालेला वाद हा एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community