आसाममध्ये ४३ वर्षांत घुसखोरी केलेल्यांमध्ये ५६ टक्के मुसलमान; CM Himanta Biswa Sarma यांची माहिती

90

आसाममध्ये अनुमाने ४८ हजार घुसखोरांची ओळख पटली असून त्यांपैकी ५६ टक्के घुसखोर हे मुसलमान आहेत, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा (CM Himanta Biswa Sarma) यांनी घुसखोरांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना दिली. वर्ष १९७१ ते २०१४ या ४३ वर्षांच्या कालावधीत राज्यात ४७ हजार ९२८ बांगलादेशी घुसले. शासनाच्या विदेशी लवादाने या सर्वांना ‘विदेशी’ घोषित केले आहे. यापैकी ५६ टक्के, म्हणजे २७ हजार ३०९ मुसलमान आहेत, तर २० हजार ६१३ हिंदू आहेत.

काय म्हणाले हिमंत बिस्व सरमा? 

मुसलमान घुसखोरांपैकी सर्वाधिक ४ हजार १८२ घुसखोर हे एकट्या जोरहाट जिल्ह्यात आहेत, तर गौहत्ती शहरात ३ हजार ८९७ मुसलमान घुसखोरांची ओळख पटली आहे. दिब्रुगड २ हजार ७८२, तर होजई, शिवसनगर, नागाव आणि कछार येथे प्रत्येकी २ हजारांहून अधिक मुसलमान घुसखोर रहात आहेत. बांगलादेशातून येणार्‍या हिंदूंची सर्वाधिक संख्या कचर, गौहत्ती आणि लखीमपूर या जिल्ह्यांमध्ये आहे. वर्ष १९७१ मध्ये भारतात आलेल्या घुसखोरांची ओळख पटवण्यामागील कारण म्हणजे ‘वर्ष १९८५ मध्ये झालेला आसाम करार.’ या करारानुसार वर्ष १९७१ मध्ये राज्यात अवैधपणे घुसलेल्या लोकांना घुसखोर मानले जाईल.

(हेही वाचा ९५ टक्‍के Hindu असलेले गोविंदपूर गाव रिकामे करण्‍याचा Waqf Board चा आदेश)

मुख्यमंत्री सरमा  (CM Himanta Biswa Sarma) पुढे म्हणाले की, बांगलादेशातील सत्तापालटानंतर तेथे हिंदू लढत आहेत, तर मुसलमान पळून जाऊन भारतात घुसखोरी करत आहेत. केवळ गेल्या एका महिन्यात ३५ बांगलादेशी मुसलमान घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत बांगलादेशातून एकही हिंदू भारतात आला नाही. अलीकडेच आसाममधील करीमगंज येथे दोघांना अटक करून परत पाठवण्यात आले. तेथील हिंदु समुदाय भारतात घुसण्याचा प्रयत्न करत नाही, तर मुसलमान घुसण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. ते पुढे म्हणाले की, बांगलादेशी मुसलमानांना आसाममार्गे बेंगळुरू आणि तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे जायचे आहे. मासूम खान आणि सोनिया अख्तर या दोन बांगलादेशींनाही वरील दोन शहरांत कापड उद्योगासाठी जायचे होते. मासूम बांगलादेशातील मॉडेलगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात रहातो, तर सोनिया ढाक्याची रहिवासी आहे. त्या दोघांना आसाम पोलिसांनी अटक केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.