Loksabha Election 2024 : 8 राज्यांतील 57 जागांवर 1 जूनला होणार मतदान; पंतप्रधानांच्या वाराणसीसह कोणत्या आहेत महत्त्वाच्या लढती ?

Loksabha Election 2024 : सातव्या टप्प्यात 904 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 809 पुरुष आणि 95 महिला उमेदवार आहेत. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, २ केंद्रीय मंत्री आर.के. सिंह आणि अनुराग ठाकूर हे मान्यवर रिंगणात आहेत.

225
Lok Sabha Election 2024 : लोकसभेत क्षेत्रीय पक्षच 'दादा'च्या भूमिकेत

लोकसभा निवडणूक-2024च्या (Loksabha Election 2024) 542 जागांपैकी सहाव्या टप्प्यापर्यंत 485 जागांवर मतदान झाले आहे. शेवटच्या 57 जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात शनिवार, 1 जून रोजी 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), २ केंद्रीय मंत्री आर.के. सिंह (R.K. Singh) आणि अनुराग ठाकूर (Anurag Thakur) हे मान्यवर रिंगणात आहेत. तर या वेळी ४ कलाकारही उमेदवाराच्या भूमिकेत आहेत. त्यामध्ये कंगना रणौत, रवी किशन, पवन सिंह, काजल निषाद हे निवडणूक लढवत आहेत. (Loksabha Election 2024)

(हेही वाचा – Pune Porsche Car Accident : ‘बाळा’चे वडील आणि आजोबांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

याशिवाय बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी, अफजल अन्सारी, विक्रमादित्य सिंग हेही नशीब आजमावत आहेत.

सातव्या टप्प्यात 904 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 809 पुरुष आणि 95 महिला उमेदवार आहेत. या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार हरसिमरत कौर बादल या पंजाबमधील भटिंडा येथील उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 198 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गुजरातमधील सुरतमधून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे केवळ 542 जागांवर मतदान होत आहे.

कोणत्या उमेदवारांची आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी

या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 199 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. तसेच 155 उमेदवारांवर खून, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 13 उमेदवार कोणत्या ना कोणत्या प्रकरणात दोषी ठरले आहेत. 4 उमेदवारांवर खुनाचे गुन्हे, तर 21 उमेदवारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. 27 उमेदवारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. 3 उमेदवारांवर बलात्काराचा गुन्हा (IPC-376) दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रक्षोभक भाषणे दिल्याप्रकरणी 255 उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Loksabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.