Uday Samant: रत्नागिरी स्मार्ट सिटीसाठी ५९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर!

128
Uday Samant: रत्नागिरी स्मार्ट सिटीसाठी ५९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर!
Uday Samant: रत्नागिरी स्मार्ट सिटीसाठी ५९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर!

तळोजाच्या धर्तीवर रत्नागिरीचा (Ratnagiri) स्मार्ट सिटी म्हणून विकासित करण्यासाठी ५९४ कोटीचा निधी एमआयडीसीतून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी ९१ कोटी ग्रामीण भागासाठी खर्च करण्यात येणार आहेत. रत्नागिरीचा कायापालट करण्यासाठी ८ दिवसांत डीपीआर तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.

(हेही वाचा-Mayank Yadav : मयंक यादव आता आयपीएल लिलावात ‘मिलियन डॉलर मॅन’)

येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात रत्नागिरी शहर स्मार्ट म्हणून विकसित करण्याच्या कामाचे भूमिपुजन तसेच महिलांना शिवणयंत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रिमोटच्या सहाय्याने उपक्रमांबाबतची माहिती देणारी चित्रफित दाखवून या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवृत्त अभियंता नंदकुमार साळवी, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता कालिदास भांडेकर, बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, आबा घोसाळे, राहूल पंडित, शिल्पा सुर्वे, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते. (Uday Samant)

(हेही वाचा-NMC : नाशिक मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस )

सामंत म्हणाले, रत्नागिरी स्मार्ट सिटी करताना शहरातील शाळा, तलाव, फुटपाथ विकसित करण्याबरोबरच ड्रेनेज सिस्टीम अधिक भक्कम करण्यावर भर दिला जाणार आहे. शहराच्या या विकासासाठी ५९४ कोटी देण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यापूर्वी तळोजा शहराचा विकास स्मार्टसिटी म्हणून करण्यात आला असून, त्याच धर्तीवर हा निर्णय घेतला आहे. त्या निधीपैकी ९१ कोटी रुपये शहरालगतच्या ग्रामीण भागात देण्यात येणार असून, यातून अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा यांचा समावेश असणार आहे. (Uday Samant)

(हेही वाचा-Haryana Election Result 2024 : हरियाणातील महत्त्वाच्या मतदारसंघात काय स्थिती? जाणुन घ्या कोण आघाडीवर?)

महाराष्ट्रातील बसस्थानकांसाठी ५०० कोटी एमआयडीसीच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. त्यामधून १९३ बसस्थानके निर्माण करण्यात येत आहेत. यातील रत्नागिरीसाठी २७ कोटीचा निधी देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. उद्योजकांना जिल्ह्यात आणणारी एजन्सी म्हणून एमआयडीसी काम करत आहे. प्राणिसंग्रहालयही होत आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना शिवण यंत्र आणि शाळांना डिजिटल फलक वाटण्यात आले. (Uday Samant)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.