डिजिटल इंडियाच्या संकल्पनेसाठी 5G तंत्रज्ञान फायदेशीर – पंतप्रधान नरेंद्र मोदी

100

देशात शनिवारपासून 5-जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ झाला आहे. 5-जी इंटरनेट सेवेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतामध्ये रिलायन्स जिओ आणि एअरटेल यासारख्या टेलिकॉम कंपन्यांनी याआधी दिवाळीमध्ये 5-जी इंटरनेट सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे.

( हेही वाचा : भारतात 5G क्रांती! पंतप्रधानांच्या हस्ते सुपरफास्ट सेवेचा शुभारंभ)

सुरुवातीला भारतामधील प्रमुख 13 शहरांमध्ये 5-जी सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5-जी चे फायदे आणि 5-जी सेवेचा देशामध्ये तंत्रज्ञानातील क्रांतीला कशी मदत होईल, याबद्दल माहिती दिली. परवडणारे तंत्रज्ञान आणि व्यापक नेटवर्कची गरज यासह डिजिटल इंडिया चळवळीला 5-जी नेटवर्कचा मोठा फायदा होणार आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, 2014 मध्ये भारतात 25 कोटी इंटरनेट युजर्स होते, आज ही संख्या 85 कोटी झाली आहे. ग्रामीण भागातून इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन आणि जुन्या युजर्सना इंटरनेटच्या 5-जी सेवेचा मोठा फायदा होईल.

5-जी नेटवर्कचा शुभारंभ हे एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल

भारताला 5-जी नेटवर्कचा खूप फायदा होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात 5-जी नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडतील. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर 5-जी नेटवर्कचा शुभारंभ हे एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.