नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या (Nashik Padvidhar Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे. अमोल बाळासाहेब खाडे, डॉ.सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब हिरामण पवार, धनंजय क्रिष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनराज देविदास विसपुते या सहा उमेदवारांनी पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून माघार घेतली आहे.
रतन कचरु बनसोडे, नाशिक वंचित बहुजन आघाडी, सुरेश भिमराव पवार, नाशिक नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी, अनिल शांताराम तेजा, अपक्ष, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर, धुळे अपक्ष, अविनाश महादू माळी, नंदूरबार अपक्ष, इरफान मो इसहाक, मालेगाव जि.नाशिक अपक्ष, ईश्वर उखा पाटील,धुळे अपक्ष, बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक अपक्ष, ॲड. जुबेर नासिर शेख,धुळे अपक्ष, ॲड.सुभाष राजाराम जंगले, श्रीरामपुर अपक्ष, सत्यजित सुधीर तांबे,संगमनेर अपक्ष, नितीन नारायण सरोदे, नाशिक अपक्ष, पोपट सिताराम बनकर, अहमदनगर अपक्ष, शुभांगी भास्कर पाटील,धुळे अपक्ष, सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर अपक्ष, संजय एकनाथ माळी,जळगाव अपक्ष असे एकूण १६ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
दरम्यान नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ.निपुण विनायक, भा.प्र.से. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
(हेही वाचा – पवारांच्या इशाऱ्यावर राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट)
Join Our WhatsApp Community