मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोविड खात्यात तब्बल ६०६ कोटी शिल्लक!

60

कोविडच्या काळात मदतीसाठी आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत कोविड खात्यात लोकांनी भरभरून आर्थिक सहाय्य केले. आतापर्यंत ७९९ कोटी जमा झाले असून, ६०६ कोटींचा निधी वापराविना शिल्लक असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. आजवर एकूण २५ टक्के रक्कम ही, जमा निधीतून खर्च करण्यात आली आहे.

जनतेस माहिती असणे आवश्यक

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे एकूण जमा निधी, खर्च करण्यात आलेला निधी आणि शिल्लक निधी याची माहिती विचारली होती. मुख्यमंत्री सचिवालयाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने अनिल गलगली यांस कळविले की, एकूण ७९९ कोटी रक्कम जमा झाली असून ६०६ कोटी रक्कम शिल्लक आहे. अनिल गलगली यांच्या मते हा निधी फक्त कोविड प्रयोजनासाठी असल्याने, इतका ६०६ कोटींचा निधी राखीव ठेवण्याचे नेमके प्रयोजन काय आहे? याची माहिती जनतेस देण्याची आवश्यकता आहे.

( हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत भाजपा पडणार गोंधळात, नगरसेवक ‘शिवबंधनात’ )

कोविड कालावधीमधील खर्च

जमा रक्कमेपैकी जी रक्कम खर्च करण्यात आली आहे ती १९२ कोटी ७५ लाख ९० हजार १२ रुपये आहे. यातील २० कोटी कोविड सेटअप करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये खर्च करण्यात आले. कोविडच्या २५ हजार चाचण्यांसाठी एबीबीओटी एम2000आरटी या पीसीआर मशीन विकत घेण्यासाठी ३ कोटी ८२ लाख ५० हजार खर्च करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत झालेल्या मजुरांच्या वारसांना ८० लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले. स्थलांतरित मजुरांच्या श्रमिक रेल्वे शुल्कासाठी ८२ कोटी ४६ लाख ९४ हजार २३१ रुपये खर्च करण्यात आले. रत्नागिरी आणि जालना जिल्ह्यात कोविड १९ च्या चाचण्या करण्यासाठी क्रमशः १ कोटी ७ लाख ६ हजार ९२० रुपये खर्च करण्यात आले.

प्लाझ्मा थेरेपीच्या चाचण्या करण्यासाठी १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, ४ पालिका वैद्यकीय महाविद्यालय, १ टीएमसी वैद्यकीय महाविद्यालय यांस १६.८५ कोटी रुपये देण्यात आले. माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी या अभियानासाठी १५ कोटी आयुक्त राज्य स्वास्थ्य संस्थेला देण्यात आले. देह विक्री करणा-या महिलांना ४९ कोटी ७६ लाख १५ हजार ९४१ रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. कोविड आजारा अंतर्गत म्युटंट मधील व्हेरिएन्टचे संशोधनाकरिता जिनोम सिक्वेसिंग करीता १ कोटी ९१ लाख १६ हजार खर्च करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.