ठाण्यानंतर नवी मुंबईतील ३० नगरसेवक शिंदे गटात होणार सहभागी

164

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरूद्ध बंड केल्यानंतर, भाजपसोबत युती करुन मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. ठाकरे यांना ठाणे महानगरपालिकेतील ६६ नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला त्यानंतर आता नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक एकनाथ शिंदेंची भेट घेणार असून शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३४, भाजपकडे २३, काँग्रेसकडे ३ आणि एमआयएमकडे २ नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपला असून, प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत ठाणे महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. असे असताना ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर हे ६६ नगररसेवक हे शिंदे गटात सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे सरकारला धक्का, तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती)

दरम्यान, नवी मुंबईतील जवळपास ३० नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व नगरसेवक गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. या नगरसेवकांमध्ये ऐरोली विधानसभेतील २० आणि बेलापूर विधानसभेतील १० असे एकूण ३० नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे ठाण्यानंतर आता नवी मुंबईत शिवसेनेला मोठं खिंडार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.