छत्तीसगड (Chhattisgarh) विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे, तर मध्यप्रदेशमध्ये सर्व 230 विधानसभा जागांवर 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 70 जागांसाठीचे मतदान संध्याकाळी 5 वाजता संपले. येथे 68.15 टक्के मतदान झाले. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सर्व 230 विधानसभा जागांवर 72.30 टक्के मतदान झाले. (Assembly Elections)
(हेही वाचा – Balasaheb Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला गालबोट नको……?)
छत्तीसगडमध्ये तब्बल 18,806 मतदान केंद्रे; बहिष्कार, ईव्हीएम बिघडण्याच्या घटना लक्षणीय
रायपूरमध्ये सर्वात कमी 58.83% मतदान झाले. मतदान संपल्यानंतर नक्षलग्रस्त गरीबीबंदच्या बिंद्रनवगढमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. यामध्ये आयटीबीपीचे जवान जोगिंदर सिंग शहीद झाले आहेत. छत्तीसगडमध्ये कोरबाच्या रामपूर अंतर्गत असलेल्या बारपाली गावात सतनामी समाजाच्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आणि घरी परतले. येथे काँग्रेस कार्यकर्त्याने जातीवाचक शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. (Assembly Elections)
(हेही वाचा – Gram Panchayat : ग्रामपंचायत इमारतीचा निधी वाढविला; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय)
महासमुंदमधील बसना सीतापूर येथील ग्रामस्थांनी नो रोड, नो व्होटचे बॅनर लावून निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. प्रतापपूर, सूरजपूर येथील मतदान केंद्र 193 मधील EVM बटण तुटले. 45 मिनिटांनी मतदान थांबले. बिलासपूर येथील पीजीबीटी कॉलेजमधील मतदान केंद्रात दुपारी दीड वाजल्यापासून ईव्हीएम बंद पडले.
रायगडमधील प्रभाग एकमध्येही तासभर मतदान थांबले. रायपूरच्या संतोषी नगर येथील श्रद्धा स्कूल आणि सप्रे स्कूलमध्ये उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाला. धमतरी येथील जलमपूर मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान वेळेत सुरू होऊ शकले नाही. (Assembly Elections)
(हेही वाचा – Balasaheb Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला गालबोट नको……?)
मध्यप्रदेशमध्ये 2533 उमेदवारांचे भवितव्य ठरणार
मध्यप्रदेशमध्ये 2533 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. शुक्रवार, 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजता संपले. यामध्ये बालाघाट जिल्ह्यातील बैहार, लांजी आणि परसवाडा या तीन नक्षलग्रस्त जागांवर दुपारी 3 वाजता मतदान संपले. मंडला जिल्ह्यातील 55 नक्षलग्रस्त मतदान केंद्र आणि दिंडोरी येथील 40 मतदान केंद्रांवरही दुपारी 3 वाजता मतदान थांबले. (Assembly Elections)
सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 72.30 टक्के मतदान झाले. रतलाम जिल्ह्यातील सैलाना मतदारसंघात सर्वाधिक 85.49 टक्के मतदान झाले. भिंड मतदारसंघात सर्वात कमी 50.41% मतदान झाले.
(हेही वाचा – Gram Panchayat : ग्रामपंचायत इमारतीचा निधी वाढविला; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय)
मतदानादरम्यान भोपाळ आणि इंदूर येथे किरकोळ वाद झाले. महू, इंदूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर तलवारींनी हल्ला केला. छिंदवाडा येथील बूथची पाहणी करण्यासाठी आलेले खासदार नकुलनाथ यांना भाजप सदस्यांनी रोखले. त्यावरून गदारोळ झाला. (Assembly Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community