Aam Aadmi Party ला निवडणुकीआधीच मोठा धक्का; सात आमदारांनी दिला राजीनामा

53
Aam Aadmi Party ला निवडणुकीआधीच मोठा धक्का; सात आमदारांनी दिला राजीनामा
Aam Aadmi Party ला निवडणुकीआधीच मोठा धक्का; सात आमदारांनी दिला राजीनामा

दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या पाच दिवस आधी दि. ३१ जानेवारी रोजी आम आदमी पक्षाच्या सात आमदारांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये त्रिलोकपुरीचे रोहित मेहरौलिया, जनकपुरीचे राजेश ऋषी (Rajesh Rishi), कस्तुरबा नगरचे मदनलाल, पालम मतदारसंघातील भावना गौर (Bhavana Gaur), बिजवासनचे बीएस जून, आदर्श नगरचे पवन शर्मा (Pawan Sharma) आणि मेहरौलीचे नरेश यादव यांचा समावेश आहे. त्याचवेळी या सर्वांचे राजीनामे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. (Aam Aadmi Party )

( हेही वाचा : Leopard Safari: प्राणी प्रेमींसाठी आनंदाची वार्ता! आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा देताना रोहित मेहरौलिया (Rohit Mehraulia) यांनी अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहिले. ते म्हणाले, “अण्णांच्या आंदोलनावेळी, मी माझी १५ वर्षापासून करत असलेली नोकरी सोडली आणि आपमध्ये सामील झालो. त्यावेळी मला वाटले की, आप समाजात समानता आणि सामाजित न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. तसेच अनेक वर्षांपासून अस्पृश्यता, भेदभाव आणि शोषणाचा त्रास सहन करणाऱ्या समाजाची सरकार स्वप्नं पूर्ण करेल असे वाटले होते”, असे रोहित मेहरौलिया (Rohit Mehraulia) लिहले. (Aam Aadmi Party )

तसेच पुढे ते लिहतात, “तुम्ही सार्वजनिक व्यासपीठांवर अनेकदा सांगितले आहे की, जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा आम्ही दलित समाजाला/वाल्मिकी समाजाच्या लोकांच्या उन्नतीसाठी काम करू. आम्ही सर्व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना नियमित करू आणि कंत्राटी पद्धती पूर्णपणे बंद करू. तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून, माझ्या समाजाने तुम्हाला सतत एकतर्फी पाठिंबा दिला, ज्यामुळे दिल्लीत तीन वेळा आपचे सरकार स्थापन झाले. (Aam Aadmi Party )

त्यांनी पत्रात पुढे लिहिले आहे की, “असे असूनही, कंत्राटी पद्धती बंद करण्यात आली नाही किंवा २०-२० वर्षे तात्पुरत्या कामांवर काम करणाऱ्या लोकांना कायम करण्यात आले नाही. रोहितसोबत आमदार नरेश यादव (Naresh Yadav) यांनीही आपल्या राजीनाम्यात लिहिले आहे की, “आम आदमी पक्ष भ्रष्टाचाराविरुद्धच्या अण्णा आंदोलनातून राजकारणातील भ्रष्टाचार संपवण्याच्या उद्देशाने उदयास आले होते, परंतु आता मला खूप दुःख होत आहे की आम आदमी पक्ष भ्रष्टाचाराविरुद्ध अजिबात नाही.” ते भ्रष्टाचार कमी करू शकले नाही तर भ्रष्टाचाराच्या दलदलीत बुडाले आहेत.”, अशी टीगका यादव यांनी केली. (Aam Aadmi Party )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.