Dr. Manmohan Singh यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

53
Dr. Manmohan Singh यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Dr. Manmohan Singh यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) निधन झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सायंकाळी एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Dr. Manmohan Singh)

मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील व सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे. तसेच आज (27 डिसेंबर) सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. (Dr. Manmohan Singh)

पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या (शनिवार २८ डिसेंबर) अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे बोललं जात आहे. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आज दिवसभर मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील ३ मोतीलाल मार्ग या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. (Dr. Manmohan Singh)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.